222 शेवगांव पाथर्डी विधासभा निवडणुक निकालाची उत्सुकता शिगेला !

अविनाश देशमुख
शेवागावं दि 22
20 तारखेला मतदान पार पडले परंतु अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपलाच नेता कसा विजयी होईल जाती पतीचे आणि पाठिंब्याचे गणित मांडून विविध गावातील कमी जास्त झालेली आकडेवारी निवडणुकीच्या आधल्या रात्री झालेल्या कुरघोड्या शेवगांव आणि पाथर्डी शहरातील कमी झालेली मतदानाची टक्केवारी शेवगांव च्या तुलनेत पाथर्डी तालुक्यात कमी झालेले मतदान कोणाला तारक आणि कोणाला मारक यावर चर्चा झडू लागल्या आहेत
मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात एकूण मतदार 374645 पैकी ६९.३६ टक्के मतदान झाले पुरुष : १३७६१३ स्री : १२२१०५
इतर : ४ एकुण अंतिम झालेले मतदान २५९७२२
एकूण मतदान झालेले मतदान – २,५९,७२२ शेवगाव तालुक्यात झालेले एकूण मतदान -१,५०,४८४ पाथर्डी तालुक्यात झालेले एकूण मतदान -१,०,९२३८मतदानाची टक्केवारी 69% राहिली आहे
शेवगांव तालुक्यातील ठरवणार पुढील आमदार कोण परंतु कट्टर समर्थक आपलाच उमेदवार लाखापेक्षा जास्त मते घेणार असा दावा करत आहेत काही याला त्याला फोन करून खाचाखोचा जाणून घेत आहेत परंतु काहींनी जिरवा जिरवीच्या राजकारणात आपलं राजकीय करियर दाव्याला लावलं आहे आपल्या मनासारखं झालं तर ठीक नाहीं तर काहींवर पार मिश्या भादरायची वेळ येणार आहे काहींनी ऐन अडचणीच्या काळात आपल्या नेत्याची साथ सोडल्याने त्या नेत्याच्या सोयीचा निकाल नाहीं लागला तर नेता आपल्याला पॉम्पलेट वाटायला सुद्धा ठेवणार नाहीं याची धास्ती पडली आहे
काहींनी आपला नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती सरकार कोणाचेही आलें तरी पुढील वर्ष हे निवडणुकांचे असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद पंचायत समिती जिल्हापरिशद ग्रामपंचायत यांच्या तुंबलेल्या निवडणुका येऊ घातल्या आहेत काहींनी विधानसभेला परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी चपलांचा नवीन जोड तर ग्यावा लागणार नाहीं ना अशी अवस्था झाली आहे
शेवगांव तहसील कार्यालयात उदया चोख पोलीस मतमोजणी होणार
शेवगाव विधानसभा मतदारसंघकरिता मतमोजणी खालील प्रमाणे एकुण मतदान केंद्र: 368:मत मोजणी फेरी संख्या: 27 ई.व्ही.एम. मतमोजणी टेबल संख्या : 14टपाली मतमोजणी टेबल संख्या: 10 ETPBS Scanning करिता टेबल संख्या : 4 मतमोजणी पर्यवेक्षक संख्या: 33 मत मोजणी सहायक संख्या 51मतमोजणी शनिवार 23/11/2024 रोजी सकाळी 8.00 वाजता तहसिल कार्यालय शेवगांव येथे सुरू होईल.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत मतमोजणी करण्यात येणार आहे मतमोजणी १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत होणार आहे. त्यासाठी ६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून स्ट्रॉगरूमभोवती तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदारसंघात १ लाख ९४ हजार ७४२ पुरुष, १ लाख ७९ हजार ६९४ स्त्रीया, इतर ६ अशा एकूण ३ लाख ७४ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ३७ हजार ६१३ पुरुष, १ लाख २२ हजार १०५ स्त्रीया व इतर ४ अशा एकूण २ लाख ५९ हजार ७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात ६९.३६ टक्के मतदान झाले आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी ८ वाजता शेवगाव तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी ६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. आवश्यकतेनुसार एखादी फेरी वाढू शकते, तर पोस्टल मतमोजणी स्वंतंत्र होणार आहे. मनमोजणीस शेवगाव, पाथर्डी, नगर येथील २०० पोलिस कर्मचारी, १ पोलिस उपविभागीय अधिकारी, ३ पोलिस निरीक्षक, ९ उपनिरीक्षक अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्टॉंगरूम भोवती सीआरपी १ प्लॅटून, एसीपी गोवा राज्य प्लॅटून, १५ पोलिस व २ पोलिस अधिकारी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. तहसील कार्यालयाच्या गेटवर व मागील बाजूस पेट्रोलिंग, तसेच गार्ड ठेवण्यात आले आहेत.