अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करण्याची दिली धमकी?

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शेतीच्या वादातून ही धमकी देण्यात आली आहे. निवेदनाची अण्णा हजारे यांनी दखल न घेतल्याने कृत्य केल्याचे समोर आले आहे.
शेतीच्या वादातून श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने यांनी १ मे रोजी अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचे म्हटले आहे. शेतीच्या वादात न्याय मिळावा, यासाठी संतोष गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिले होते. त्यांनी मदतीची मागणी केली होती. मात्र अण्णा हजारे यांनी निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप गायधने यांनी केला आहे. तसेच राळेगण सिद्धीत जाऊन अण्णांची हत्या करणार असल्याचा इशारा गायधने यांनी दिला आहे.
गायधने म्हणाले, अण्णा हजारे यांना निवेदन देऊन आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा होती. मात्र अण्णा हजारे देखील त्या प्रकरणात मॅनेज झाले. मी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. मात्र मी कायर नाही अण्णा हजारेंची हत्या करणार हे जाहीरपणे सांगू शकतो.