निसर्ग संवर्धनासाठी जागृतीची गरज – प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख

राजूर प्रतिनिधी
: निसर्गाचे स्थान अनन्यसाधारण असून निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.त्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी जाणीव जागृतीची आवश्यकता आहे ” असे प्रतिपादन राजुर येथील ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी प्रतिपादन केले
महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील निसर्ग संवर्धन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ” ग्रीन क्लब स्थापना ” कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आपल्या पुढील भाषणात प्राचार्य डॉ.देशमुख म्हणाले की, मानवाने आपल्या भौतिक सुखासाठी, नैसर्गिक संपत्तीचा अतिरेकी वापर केला आहे परिणामतः जागतिक तापमान वाढीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे या पुढील काळात विविध प्रकारचे नवीन विषाणू जन्मास येतील व ते पृथ्वीतलावरील एक मोठे आव्हान असेल,त्यामुळे जगात अनेक समस्या निर्माण होतील. म्हणून युवकांमध्ये पर्यावरण समतोल व निसर्ग संवर्धनाविषयी जाणीव जागृती होणे काळाची गरज आहे “
याप्रसंगी महाविद्यालयात ग्रीन क्लब ची स्थापना प्राचार्य डॉ. देशमुख यांचे हस्ते करण्यात आली असून त्या मार्फत नैसर्गिक संवर्धन व जागृती मोहीम हाती घेणार असल्याची माहिती विभागाचे समन्वयक प्रा. उमेश अवसरकर यांनी यावेळी दिली. प्रा.विनोद येलमामे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन च प्रा. अवसरकर यांनी केले या कार्यक्रमास साठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.