पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे विकास कामाचे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात

सरपंचांच्या जिद्दी स्वभावामुळेच विकासकामांना वेग : सुजित झावरे पाटील
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे तसेच नव्याने वडनेर हवेली व मुंगशी या गावांसाठी मंजुरी मिळालेल्या तलाठी सजा कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झावरे म्हणाले वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर यांच्या जिद्दी स्वभावामुळेच वडनेर हवेली गावातील विकासकामांना वेग आला असुन त्यांची कुठल्याही विकासकामांच्या पुर्णत्वासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या पद्धतीचा आपणास हेवा वाटतो असे ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद जलसंधारण समिती सदस्य माननीय श्री राहुल शिंदे पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी, पारनेर पंचायत समिती माजी सभापती गणेश शेळके , सुपा शहराचे मा. उपसरपंच दत्ता नाना पवारयांसह अनिल वाबळे, भरत गट, डॉ.विलास काळे, भाऊ सोनुळे, सरपंच लहु भालेकर, उपसरपंच नंदू भालेकर, मा. सरपंच राजेंद्र सोनुळे, किशोर वाबळे, उत्तम भालेकर, विनायक कर्डिले, बाबूशेठ भालेकर, मोहन भालेकर, भाऊसाहेब कुटे, विष्णुपंत सोनुळे, बबलू बडे, संजय दरेकर, दत्तात्रय भालेकर, किसन शिंदे, सौरभ वाळुंज, योगेश शिंदे, संग्राम भालेकर, प्रकाश वाळुंज, सुनील बडे, वसंत गाडे, वसंत भालेकर, भाऊसाहेब दरेकर, उत्तम हरदे मेजर, संजय हारदे, देवराम बडे, अरुण सोनुळे, ज्ञानदेव भालेकर, सुभाष बडे, शेखर भालेकर, दत्तू वाळुंज, संतोष गाडे, भास्कर भालेकर व गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
पुढे बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, तलाठी कार्यालयाचे उद्घाटन करत असताना आपणास अत्यानंद होत असुन यापुढे गावातच तलाठी उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अमुल्य असा वेळ वाचणार आहे. कुठल्याही गावचा विकास साधण्यासाठी त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांचा समन्वय असणे फार गरजेचे असल्याने वडनेर हवेली गावचा विकास साधण्यासाठी ह्या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे.
तसेच जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला पाण्याची सोय उपलब्ध होणार असुन उन्हाळ्यात अथवा दुष्काळी परिस्थितीत पाण्याबाबत दाखवला जाणारा संवेदनशीलपणा पावसाळ्यातही दाखवला पाहिजे असेही स्पष्ट व रोखठोक मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ बढे यांनी केले तर सरपंच भालेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.