इतर

भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिनी वीज कामगार महासंघाचा रक्तदानाचा महायज्ञ

पुणे- भारतीय मजदूर संघाच्या 68 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी , तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे संस्थापक कै. बाळासाहेब साठ्ये, आण्णाजी अकोटकर या कामगार क्षेत्रातील त्रिमुर्तींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रम वर्षभर राबविण्याची भूमिका कामगार महासंघाचे( संलग्न भारतीय मजदूर संघ)ने घेण्यात आली होती त्यातील एक स्तुत्य कार्यक्रम म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात ३६जिल्ह्यात ३०झोन मध्ये एकाच दिवशी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . पुणे झोनच्या वतीने कार्यकर्त्यांनी कार्यक्षेत्रात याबाबत प्रचार व प्रसार करून रक्तदान करिता जागृती निर्माण केली होती. वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्व: ईच्छेने सभासद बंधु भगीनी यांनी सौदामिनी सभागृह मंगळवार पेठ पुणे येथे रक्तदानाचा शिबीरात उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. उपस्थितांमध्ये महावितरण प्रशासनाचे वतीने पुणे झोनच्या वतीने मा.उपमुख्य औद्योगीक संबध अधिकारी शिरीष काटकर रास्ता पेठ सर्कलचे अधिक्षक अभियंता मा अरविंद बुलबुले, पुणे ग्रामीण सर्कलचे अधिक्षक अभियंता मा युवराज जरग . गणेशखिंड सर्कलचे अधिक्षक अभियंता मा.संजीव राठोड तसेंच भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अडव्होकेट अनिल ढुमणे अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे राष्टीय महामंत्री सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे संघटनमंत्री विजय हिंगमीरे ,कार्याध्यक्ष सुनील सोमवंशी , क्षेत्र प्रभारी सुभाष सावजी , प्रभारी अशोक जाचक धनंजय इनामदार ,कार्यसमीती सदस्य मुकुंद त्रंबके, दिलीप आंबेगावकर,महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार महासंघाचे पुर्व अध्यक्ष श्री शरद संत , कल्याण निधी ट्रस्टचे कोषाध्यक्ष जयंत देशपांडे,,पारेषण कार्याध्यक्ष विश्वास भैरवकर, भरत अभंग , पुणे प्रादेशिक कार्यालय व पतसंस्था अध्यक्ष तुकाराम डिंबळेे ,पुणे झोन अध्यक्ष ज्ञानेश्वर माने सचिव सुरेश जाधव, पारेषण झोन सचिव राजू साळवी,पुणे झोन उपाध्यक्ष अरुण महाले, सहसचिव राजेंद्र हवालदार,सॊ मधुरा घनवटकर, संघटनमंत्री संजय नायकवडी, प्रल्हाद अवसरे,रास्ता पेठ सर्कलचे सचिव महेंद्र खिरोडकर, अध्यक्ष विजय जाधव, गणेशखींड सर्कलचे सचिव शेखर मारणे अध्यक्ष सुनील बोंगाळे ,पद्मावती विभाग अध्यक्ष सुनील खुडे, सचिव प्रवीण शितोळे, रास्ता पेठ विभाग अध्यक्ष रामाकांत खलाने,नगररोड विभाग अध्यक्ष नंदु अहिरे, पर्वती विभाग अध्यक्ष बालाजी क्षीरसागर ,सचिव गणपत बनकर,कोथरूड विभाग अध्यक्ष भैरव वडणे, सचिव अशोक देशमुख, बंडगार्डन विभाग अध्यक्ष जनार्दन शिवरकर, सचिव महेश शिरसाठ, शिवाजीनगर विभाग सचिव राहुल अवचट ,रास्ता पेठ चाचणी विभाग सचिव बळीराम पाटील,पतसंस्थेचे सचिव सुनील भोसले,अनिल फाळके, प्रवीण जुमले,संचालीका कु. सृती वाड, सौ सविता येवलेकर,व अनेक उपविभाग शाखा पदाधिकारी बंधु-भगीनी व अक्षय ब्लड बँक सर्व सहकारी सौ भाग्यश्री जाधव,श्री जाधव,प्रशांत शिगवण,हे उपस्थितीत होते .कार्यक्रमाची सुरुवात श्रमीक गीता ने आणि दीप प्रज्वलनाने झाली प्रमुख पाहुणे यांचे परिचय स्वागत शुभेच्च्छा संदेश झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश जाधव यांनी केले आभार प्रदर्शन………. मनोगत व्यक्त केले

.सकाळी ९-००ते सायं ५-३० वा पर्यंत यशस्वी रक्तदान शिबीर पार पडले,यात एकूण १४९ रक्तदाते उपस्थित होते त्यांपैकी तब्ब्ल १०१रक्त्दात्यांनी रक्तदान केले कोथरूड विभागातील आप्पा जाधव यांना वैद्यकीय कारणास्तव रक्तदान करता आले नाही परंतु हे देशसेवेचे व्रत स्वीकारलेला कार्यकर्ता गप्प ना बसता आपली पत्नी सौ सुरेखा जाधव आदर्श शिक्षीका पुणे महानगर पालीका तसेंच मुलगी कु.स्नेहल जाधव, मुलगा चि विनय जाधव यांना रक्तदानासाठी आणून रक्तदान केले याशिवाय आम्ही देखील देशसेवेत कमी नाही हे नुकतेच कोथरुड वरुन बंडगार्डन विभागात बदलुन आलेले श्री इम्रान तांबोळी यांनी स्वत: रक्तदान कारून आपली पत्नी सना तांबोळी यांचेही रक्तदान केले याशिवाय याचा उच्चांक आपल्यातीलच एम,पी,एस,सी,द्वारे महाराष्ट्र शासनात क्लास टू ऑफीसर म्हणून रुजू झालेले अपंगत्वाची तमा न बाळगतां सतत यशाची शिखरे सर करणारे श्री .निलेश सस्ते यांनी अतिशय उत्साहात येऊन रसक्तदान केले,प्रभारी आंबेगावकर साहेब यांची दोन्ही मुले चि.प्रणव व चि .दीपक हे आय.टी. क्षेत्रात अभियंता असून त्यांनी देखील देशसेवेसासाठी आपले रकदान केले या सर्वांचे पुणे झोनच्या वतीने स्वागत करून मान्यवरांचे हस्ते यथोचीत असा सन्मान करण्यात आला , सर्व रक्तदात्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र, टूल किट, टीफीन,भेट स्वरूपात देण्यात आले रक्तदान शिबिराचे नियोजन महाराष्ट्र वीज कामगार महासंघ पुणे झोन सचिव सुरेश जाधव व वितरण व पारेषण झोनचे कार्यकारिणी वतीने संयुक्त्तपणे यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button