अकोल्याच्या विकासाचे शिल्पकार व माजी मंत्री मधुकररावं पिचड काळाच्या पडद्याआड!

कर्मसिद्धांताचा उपासक गमावला:- देवेंद्र फडणवीस
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं – अजित पवार
अकोले / प्रतिनिधी –
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंदर व्यक्तिमत्व देश पातळीवर आदिवासींचे संघटन करून करणारे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी समाजाचे नेते, भाजपा नेते मधुकरराव पिचड हे आज काळाच्या पडद्याआड गेले
त्यांच्यावर नाशिक येथील एका हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड महिन्यापासून उपचार सुरू होते उपचारादरम्यान आज शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता वयाचे ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले
. गेले दिड महिन्यापासून ते बेनस्ट्रोक मुळे आजारी होते. त्यांच्या वर उद्या शनिवारी दिनांक ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वा राजूर ता. अकोले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
मधुकरराव पिचड यांची 1972 ला अकोले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. 1972 ते 1980 या काळात ते पंचायत समितीचे सभापती होते. 1980 ते 2009 असे सलग 7 वेळा आमदार झाले. राज्याच्या मंत्रिमंडळ विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती. 1995 ते 1999 या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळले होते. राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक सदस्य तसेच प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला: – देवेंद्र फडणवीस
भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
———–/———
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला.
मधुकराव पिचड यांनी १९७६ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संघाची स्थापना केली तर १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार म्हणून 1980 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 1985 पर्यंत काम केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून 1985 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 1990 पर्यंत काम केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून 1990 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 1995 पर्यंत त्यांनी काम केले.
25 जून 1991 रोजी आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकन झाले आणि सुधाकरराव नाईक मंत्रालयात 3 नोव्हेंबर 1992 पर्यंत काम केले .
6 मार्च 1993 रोजी आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालय , पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रालयात 14 मार्च 1995 पर्यंत काम केले .
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून 1995 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2000 पर्यंत काम केले.
27 ऑक्टोबर 1999 रोजी तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकन झाले आणि 16 जानेवारी 2003 पर्यंत पहिले देशमुख मंत्रालयात काम केले .
1999 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग पाचव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2004 पर्यंत काम केले.
2004 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग सहाव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2009 पर्यंत काम केले.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं
उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनानं, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या पिचड साहेबांनी पक्षासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
2009 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग सातव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2014 पर्यंत काम केले.
11 जून 2013 रोजी आदिवासी विकास मंत्रालय, आदिवासी विकास मंत्रालय, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकित आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रालयात 26 सप्टेंबर 2014 पर्यंत काम केले . मधुकरराव पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी ए एल एल बी करुन वकिलीची शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राज्याचे विरोधी पक्ष नेतेपदावर काम केले
राजकारणात त्यांनी एक चांगली ओळख निर्माण केली होती त्यांच्या जाण्याने अकोले तालुक्याच्य विकासाचा शिल्पकार हरपला अशी भावना व्यक्त केली जात आहे अनेक वर्षाचा दीर्घकाळाचा सोबती तालुक्याने गमावला असल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे
— – ———/