धोत्रे खुर्द व तुफानवस्ती शाळेचा आदर्श घ्यावा : सभापती काशिनाथ दाते सर

पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील अतिशय ग्रामिण व दुर्गम भागातील जिल्हा परिषदच्या धोत्रे खुर्द व तुफानवस्ती शाळेंना अचानक जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषि समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी भेट देवून मुलांशी संवाद साधला.
पहिलीतील विद्यार्थ्यांचे गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन व सुंदर हस्ताक्षर पाहून उपस्थित सर्वांनी वर्ग शिक्षक सचिन ठाणगे व प्रितम गलांडे यांचे कौतुक केले. तिसरी,चौथीच्या विद्यार्थ्यांचे चाळीस पर्यंतचे पाढे पाठांतर व शैक्षणिक दर्जा पाहून एकनाथ कोरडे व चारुशिला रायकर या शिक्षकांचे अभिनंदन केले.
शाळेमधे विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व व शैक्षणिक विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवीले जातात.
दोन्ही शाळेमधे मेंढपाळ करणारे धनगर समाज व आदिवाशी समाजाची मुले शिक्षण घेत आहेत. कोरोना काळातही ‘ वस्ती तेथे शिक्षण ‘ या उपक्रमाव्दारे मुलांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. शासकिय कोणत्याही निधीची वाट न पाहता शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शहरातील इंग्लीश मेडियम शाळेपेक्षाही श्रेष्ठ दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता असलेली आदर्श शाळा तयार केल्यामुळे या शाळेंचा आदर्श जिल्ह्यातील इतर शाळांनी घ्यावा असा गौरवोदगार बांधकाम व कृषि समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी काढले.
अतिशय ग्रामिण आणि दुर्गम भागात लोकसहभागातून तयार झालेले जिल्हा परिषद शाळेचे आदर्श मॉडेल स्कूल पाहण्याचे भाग्य लाभले असेही सभापती यांनी मत व्यक्त करून शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांचे कौतुक केले
यावेळी उद्योजक सुरेश धुरपते, उद्योजक पोपट चौधरी, बंडूशेठ रोहोकले, म.न.से. तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, युवा सेना उपाध्यक्ष सुभाष सासवडे, बाळासाहेब नाईकवाडी, शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी, मा.सरपंच बाबासाहेब सासवडे, उपसरपंच राजूशेठ रोडे ,ग्रां.प. सदस्य पप्पूशेठ गांगुर्डे, जालिंदर भांड,अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पंढरीनाथ तागड, उपाध्यक्ष पोपट सासवडे, गंगाराम तागड, दत्ताभाऊ सासवडे,शरद गवते, दिपकशेठ भागवत, रभाजी भांड गुरुजी, यश राहाणे, राहूल सासवडे, हारकू नाईकवाडी, भास्कर तागड, संकेत नाईकवाडी, सागर नाईकवाडी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.