ग्रामीण विकासात युवकांचा सहभाग असावा- आमदर लहामटे

विलास तुपे
राजूर: प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून श्रम संस्कार होतात तसेच समाजसेवेची गोडी निर्माण होते, युवकांचा ग्रामीण विकासात सहभाग आवश्यक असावा असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक,व ॲड.एम. एन.देशमुख महाविद्यालय राजुर आयोजित जहागीरदारवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागीरदार वाडी चे सरपंच पंढरीनाथ खाडे उपस्थित होते.

आपल्या पुढील भाषणात आमदार लहामटे म्हणाले की ,”आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून आजच्या तरुणांनी जनजागृती साठी पुढे आले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी करून शिबिर आयोजना मागील भूमिका विशद केली.
या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत, सत्यनिकेतन संस्थेचे सचिव .टी.एन. कानवडे, सत्यनिकेतन संस्थेचे संचालक एस .टी येलमामे , श्रीरामशेठ पन्हाळे, काठे, तसेच ग्रामसेवक माधव धोंगडे, कळसुबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव, पोलीस पाटील नामदेवजी खाडे, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई घाने, उपसरपंच रुक्मिणी करटुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या विशेष हिवाळी शिबिरात २०० विद्यार्थी सहभागी झालेले असून शिबिर कालावधीत वृक्ष संवर्धन श्रमसाक्षरता, जलसंवर्धन व वनराई बंधारे निर्मिती, बालविवाह बंदी, , ग्राम सर्वेक्षण, आरोग्य जनजागृती, सर्वरोग निदान शिबिर, यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एल. बी. काकडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.थोरात बी.के यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे आभार प्रा.तेलोरे बी.एच यांनी केले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सौ.डी बी तांबे,प्रा अस्वले एस.आर.,डॉ नितीन देशमुख, निकम मामा, विलास लांघी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.