काकनेवाडीचा युवराज वाळुंज झाला पी. एस. आय.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
काकनेवाडी येथील श्री नबाजी रेवजी वाळुंज यांचे चिरंजीव युवराज वाळुंज यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेतून पी एस आय पदी निवड झाली.
काकनेवाडी गावातील पहिला पी एस आय होण्याचा मान युवराजला मिळाला आहे.कान्हूर पठार वि.का.से.सोसायटीचे संचालक पोपट रेवजी वाळुंज व हभप शिवाजी रेवजी वाळुंज यांचे पुतणे आहेत. लहानपणापासूनच हुशार विदयार्थी म्हणून त्याला ओळखत होते.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर युवराजने हे यश प्राप्त केले आहे. त्याचे प्रा. शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा काकनेवाडी व माध्यमिक शिक्षण ढोकेश्वर विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे झाले आहे.
गावात युवराजचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तालुक्याचे माजी आमदार निलेश लंके, काकनेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अशोक वाळुंज,उद्योजक भगवानशेठ वाळुंज सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शंभूराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष गवराम वाळुंज,उपाध्यक्ष हभप रंगनाथ महाराज वाळुंज व ग्रामस्थ मंडळींनी युवराजचे अभिनंदन केले.