अकोल्यात पोलीस कर्मचारी किशोर लक्ष्मण तळपे यांचे ह्दय विकाराने निधन

अकोले प्रतिनिधी –
— अकोले पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस हेड कॅान्स्टेबल किशोर लक्ष्मण तळपे ( वय ४० वर्षे) यांचे ह्दय विकाराने निधन झाले आहे .
अकोले पोलिस स्टेशनला गेली चार वर्षापासून कार्यरत असलेले ब्राम्हणवाडा बीटचे अमलदार पोलिस कॅान्स्टेबल किशोर लक्ष्मण तळपे हे आज ड्युटी वर ठाणे अंमलदार असताना दुपारी त्यांना ह्दय विकाराचा झटका आला यावेळी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ भांडकोळी हॅास्पिटल येथे नेले मात्र उपचारापुर्वीच त्यांचे निधन झाले .
घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी रुग्णालयात भेट दिली.
कै.किशोर तळपे हे डोळासणे येथील रहिवासी असुन गेली ४ वर्षापासून ते अकोले पोलिस स्टेशनला कार्यरत होते अतिशय शांत, संयमी व कर्तव्यदक्ष पोलिस कॅान्स्टेबल म्हणून परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी व १० वर्षाचा एक मुलगा,एक बहीण असा परीवार आहे.त्यांचे अचानक झालेल्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे