येडुमाता यात्रेसाठी भाविकांचा ओघ सुरू!

रविवारी येडु मातेची यात्रा
कोतुळ प्रतिनिधी
महाराष्ट्रातील तमाम नाईक समाजाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे पिंपळदरी( ता अकोले) येथील येडु माता यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडुमाता देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी मोठा यात्रा उत्सव भरतो राज्य भरातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात हा यात्रा उत्सव चार ते पाच दिवस चालतो दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात गेल्या दोन वर्षापासून covid-19 मुळे ही यात्रा दोन वर्षापासून बंद होती यावर्षी प्रथमच ही यात्रा भरत असल्याने यावर्षी गर्दीचा उच्चांक होईल अशी अपेक्षा आहे
यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापासून पिंपळदरी येथील येडु माता देवस्थान कडे येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे अनेक भाविक रस्त्याने देवीच्या नावाचा गजर करत प्रवास करत आहे वाहनांच्या सहाय्याने तसेच काही भाविक पायी प्रवास करत देवी
कडे येत आहे गेल्या तीन दिवसापासून गेल्या तीन दिवसापासून भाविकांची गर्दी सुरू असल्याने यावर्षी अधिक गर्दी होईल असे चित्र दिसून येत आहे कोरोना कारणामुळे दोन वर्षांपासून यात्रा उत्सवांचा बंद असल्याने व्यवसायिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते या यात्रेत दरवर्षी लाखो ची उलाढाल होते यामुळे या यात्रेत हजारो व्यवसायिक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, खेळणी विक्रीसाठी घेऊन येतात गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी व्यवसायिकांचीहिब गर्दी आहे यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने अनेक व्यावसायिक या यात्रेत साठी पसंती करतात नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील अनेक व्यवसायिक याठिकाणी यात्रेत आपली दुकाने मांडतात कोरोना नंतर प्रथमच यात्रा भरत असल्याने गेल्या दोन दिवसापासून व्यावसायिकांची मोठी गर्दी दुकानात थाटण्यासाठी झाली मात्र यात्रा कमिटीच्या गलथान कारभारामुळे अनेक व्यावसायिकांना मध्ये संघर्ष पाहायला मिळाला व्यावसायिकाना दुकानांसाठी जागा देताना भेदभाव करत असल्याने देवस्थान कमिटी विषयी अनेक व्यापाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आम्ही अनेक वर्षांपासून ज्या ठिकाणी दुकानें मांडतो ती जागा ऐनवेळी बदल केल्याने सर्वच दुकांदारामध्ये संघर्ष दिसून आला तो देवस्थान कमिटीने ऐनवेळी हा निर्णय घेतल्याने हा प्रश्न उद्भवल्याचे दिसून आले जागा आदला। बदली कारणाने व्यावसायिकांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे आज पहायला मिळाले पुरेशे नियोजन न केल्याने अनेक भाविकांनी देवस्थान कमिटी विषयी नाराजी व्यक्त केली रविवार रविवारी येडू मातेची यात्रा असल्याने या दिवशी गर्दीचा उच्चांक मॉडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे या यात्रेत अनेक भाविक नवसपूर्तीसाठी बोकडांचा बळी देतात यामुळे ही यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे