शेंडीच्या केंद्र शाळेने जपला विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याचा आगळा वेगळा उपक्रम

भंडारदरा / प्रतिनिधी
शेंडीच्या जिल्हापरिषदेच्या केंद्र शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत असुन शाळेने ‘ उपक्रमशिल शाळा ‘ म्हणुन नविन ओळख तयार केली आहे .
शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातुन स्वागत करण्यात येत आहे .अकोले तालुक्यातील शेंडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत असतो . ईयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत विद्याथी या शाळेत शिकत असुन अगदी लहानातल्या लहान मुलापासुन ते वर्गशिक्षकांपर्यंत प्रत्येकाचा वाढदिवस या शाळेतच साजरा केला जातो . यासाठी केकसुद्धा मागितला जातो .

परिसरातील लावलेल्या फुलझाडांचा पुष्पगुच्छ तयार करुन वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्याचे औक्षण करुन पुष्पगुच्छ बर्थडे बाॅयला दिले जाते . मुलांना केकच्या स्वरुपात खाऊ दिला जातो . जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश गायखे ,सुरेश पटेकर व महानंदा कहाणे हे वर्गशिक्षक अगदी उत्साहात हा उपक्रम साजरा करतात . तितकीच तोलामोलाची साथ देखील पालकांची सुद्धा या शाळेला मिळते आहे . म्हणुनच या शाळेची ओळख ” उपक्रमशिल शाळा ” म्हणुन परिसरात झाली आहे . शाळेच्या या उपक्रमाचे शेंडिचे सरपंच दिलीप भांगरे यांनी अभिनंदन केले आहे .