श्री बाळेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

संगमनेर- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळे पठार या विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री .उत्तम खांडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सारोळे पठाराचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य योगेश्वरी सहकारी दूध संस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन सचिव सभासद तसेच एडीसीसी बँक सारोळे पठार शाखाधिकारी, मारुती मंदिर व इतर देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक समिती तसेच गोपाळकृष्ण, ज्योती बाबा, स्वामी समर्थ भजनी मंडळ तसेच महिला, पुरुष बचत गट तसेच आश्रम शाळा माध्यमिक उच्च माध्यमिकचे प्राचार्य व प्राथमिकचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व स्टाफ सैन्य दलातील सन्मानित ह आजी माजी सैनिक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक तसेच बाळेश्वर विद्यार्थी वस्तीगराचे अधीक्षक व कर्मचारी तसेच नवभारत कन्या निवास च्या अधिक्षिका व कर्मचारी तसेच सारोळे पठार व हनुमानवाडी अंगणवाडी सेविका व मदतनीस याप्रसंगी उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य श्री .उत्तम खांडवी प्रास्ताविकात बोलत होते. विद्यालयामध्ये आय,टी.सी लॅब अटल टीकरिंग लॅब, वर्ग खोल्यांमध्ये डिजिटल रूम व इतर सर्व भौतिक सुख सुविधा संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केल्या आहेत. या विद्यालयात मला मुख्याध्यापक म्हणून साधारण तीन महिने झाले असून विद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ प्रकल्प राबविणे सर्वात महत्त्वाचा विषय असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शिष्यवृत्ती, ज्ञानवर्धिनी, एन एम एम एस, नवोदय, राष्ट्रभाषा हिंदी, चित्रकला इत्यादी तासिका सुरू केल्या त्या नियमितपणे सुरळीत राहण्यासाठी अग्रक्रम दिला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये भास्कराचार्य व एन.टी.एस परीक्षा बाह्य स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचा मानस आहे मी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर 55 अप्रगत विद्यार्थ्यांच्या तासिका नियमितपणे सुरू असून त्यांची वाचन क्रिया चालू आहे. पंचक्रोशीतील शाळेचा शैक्षणिक गुणवत्तेचा पूर्वीचा नावलौकिक असून तो पुन्हा पूर्वीप्रमाणे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करील.चालू शैक्षणिक वर्षांमध्ये मुला मुलींच्या वस्तीगृहामध्ये आदर पुनावाला यांच्याकडून पाच संगणक संच, अखिल भारतीय स्वामी समर्थ परिवाराकडून तीस हजार रुपये किमतीचे वस्तीगृहातील मुला मुलींसाठी शैक्षणिक साहित्य, माजी प्राचार्य श्री सावंत सर यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचे खेळाचे साहित्य, माननीय गोडबोले मॅडम पुणे यांच्याकडून खाऊचे वाटप व इंजिनिअर पोखरकर यांच्याकडून वस्तीगृहातील दहावीतील सर्व मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप असे वस्तुस्वरूपात देणगी मिळवण्यात दोन्ही वस्तीग्रहाचे अधीक्षक व माझ्या सर्व सहकाऱ्यांना यश प्राप्त झाले आहे. वस्तू स्वरूप देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांच्या दातृत्वाला सलाम तसेच गुणवत्ते संदर्भात पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न केला जाईल.
याप्रसंगी गावातील ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.