प्रिंट मिडियाचे भविष्य उज्ज्वल
– प्रा. दिलीप फडके
नाशिक : तंत्रज्ञानामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणे माध्यम क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविलेले आहे. आज विविध माध्यमांतून घडलेल्या घटनांची रियल टाईम माहिती प्रत्येकाला उपलब्ध होत असते. तरीदेखील मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्र वाचले जातात. विशेषतः संपादकीय लेखांतून चिकित्सक व विश्लेशनात्मक ज्ञान, माहिती उपलब्ध होत असल्याने प्रिंट मिडियाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी केले.
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे यांना काल पहिला जीवन गौरव पुरस्कार काल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे. रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात हा दिमाखदार सोहळा पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, प्रभारी सचिव डॉ. गौरव सामनेरकर, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, आर्कि. मकरंद चिंधडे, डॉ. गौरी कुलकर्णी, दमयंती बरडिया उपस्थित होते. या कार्यक्रमात शैलेंद्र तनपुरे यांची पत्रकारितेच्या जीवन प्रवासावर आधारित प्रकट मुलाखत रोटरी क्लबचे जनसंपर्क संचालक संतोष साबळे यांनी घेतली. श्री. साबळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. तनपुरे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली.
संपादक हा समाजाचा आरसा – शैलेंद्र तनपुरे
यावेळी बोलताना दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणाले, समाज व्यवस्थेत माध्यमे हा तिसरा डोळा म्हणून काम करीत असून सामाजिक बांधिलकी जोपासतात. घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी सौम्य भाषेत वाचकांसमोर मांडतात. संपादक हा समाजाचा आरसा असून त्याला प्रसंगी चांगल्या वाईट अनुभवांनादेखील सामना करावा लागतो. या अनुषंगाने त्यांनी आपल्या जीवनातील काही अनुभव सांगितले.
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्याचप्रमाणे संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना वेळोवेळी माध्यमांमध्ये स्थान देणाऱ्या सर्व प्रसिद्ध माध्यमांच्या प्रतिनिधींचाही यावेळी प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी संतोष साबळे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष श्री. बरडिया यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास माध्यम क्षेत्रातील मान्यवर तसेच नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले. डॉ. गौरव सामनेरकर यांनी आभार मानले.
संजय भड (दिव्यमराठी), गायत्री जेऊघाले (महाराष्ट्र टाइम्स), सतीश डोंगरे (पुढारी), अरुण मलाणी (सकाळ), मुकुंद पिंगळे (अॅग्रोवन), हितेश शहा (भ्रमर), देवयानी सोनार (गावकरी), धनंजय बोडके, (लोकनामा),अनिल दिक्षित (पुण्यनगरी), अमोल यादव (लोकमत) या माध्यम प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला
……………………………………………………………………………………………………………
,