एम आय डीसी परिसरात चोऱ्या करणारी टोळी गजाआड!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शिंगवे तुकाई शिवारातील एम आय डी सी कंपनीतील शेडचे पत्रे व लोखंडी अॅगल चोरीला गेल्याची फिर्याद श्रीकृष्ण आबासाहेब काळे रा वडुले ता. शेवगाव यांनी दिली होती.
एम आय डी सी परिसरात त्यांच्या मालकीच्या कंपनीचे
शेडवरील पत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या
बाबत गु र नं २१/२०२३ भादं वि कलम ३७९, ३४
प्रमाणे सोनई पोलीस ठाण्यात दि. २२ जानेवारी
रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मिळालेल्या
गोपनीय माहिती नुसार सागर मारुती पटारे वय
२४, सुनील बबन वाघ वय २०, अविनाश विठ्ठल वाघ
३१, अनिल बबन वाघ वय ३१ सर्व राहणार
लोहगाव या. नेवासा यांना ताब्यात घेऊन त्यांचे
कडील पत्रे लोखंडी अँगल असा ६४ हजार ५००
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याचे सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.
सदरील गुन्ह्यातील आरोपी विरोधात गु र नं ३६८/२०२२, गुर नं २१/२०२३, गु र नं ३१/२०२३, भा दं वी ३७९, ३४ प्रमाणे सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक
राकेश ओला, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक
श्रीरामपूर, संदिप मिटके शेवगाव यांच्या सुचना व
मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे माणिक
चौधरी, पि.एस. आय. राजेंद्र थोरात, सहाय्यक
फोजदार काकासाहेब राख, पो. हे कॉ दत्ता
गावडे,पो.ना.नानासाहेब तुपे, पो.कॉ. रामदास
तमनर,पो.कॉ.विठ्ठल थोरात,पो.कॉ.ज्ञानेश्वर आढाव,
चालक हे. कॉ. मारुती पवार, हे.कॉ. ढोले यांनी
सदरील कारवाई केली.