श्रीक्षेत्र एकदरे ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान.
अकोले/प्रतिनिधी–
संत निवृत्तीनाथ वारकरी संप्रदाय सेवा ट्रस्ट संचलित,एकदरे अकोले तालुक्यातील महाकाळाच्या पायथ्याशी असलेले पिंपळदरावाडी,चंदगीरवाडी, जायनावाडी,बिताका ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी एकदरे ओम श्री.मोखाजी बाबा मंदीर व ओम श्री मारुती मंदिर येथुन दिंडीचे प्रस्थान झाले.
ह.भ.प.पांडुरंग महाराज भांगरे,ह.भ.प.पंढरी महाराज चौरे, ह.भ.प.इदे महाराज,ह.भ.प.काळु पुनाजी भांगरे शिवाजी काशिनाथ भांगरे,ह.भ.प.किसन महाराज पेढेकर,यांच्या मार्गदर्शनाखाली हा पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो.
ह.भ.प.पांडुरंग महाराज भांगरे यांनी तुळसीवृंदावन,विना,टाळ, मृदुंग,यांचे पुजन करून टाळ मृदुंगांच्या गजरात भजन करीत संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.त्यानंतर पहिला मुक्काम जायनावाडी येथील समस्थ ग्रामस्थांनी संध्याकाळी दिंडीचे स्वागत केले.गावातील सर्व महिलांनी व बालगोपाळांनी सहभाग घेऊन दिंडीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडीचे त्र्यंबकेश्वर च्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी ह.भ.प.संपत महाराज भांगरे,ह.भ.प.यशवंत महाराज बेंडकोळी,ह.भ.प.इदे महाराज,मृदुंगाचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज,ह.भ.प.गोरख महाराज भांगरे ह.भ.प.भागा महाराज भांगरे,बाळु डगळे,बाजीराव भांगरे,सुरेश भांगरे,यशवंता भांगरे,हरिदास भांगरे,भदु बाबा भांगरे,नाना चौरे,विनेकरी ह.भ.प.गणपत महाराज भांगरे, ह.भ.प.विलास महाराज भांगरे,तुळशी वृंदावन महिला,चोपदार ह.भ.प.किसन महाराज मदगे,यावेळी उपस्थित होते.