इतर

विनोबांचे शिक्षण विचार हे जीवन अनुभवाशी नाते सांगणारा आहे.-गिरीश प्रभुणे

संगमनेर- प्रतिनिधी
विनोबांच्या शिक्षण विचार ही जीवन अनुभवाशी नाते सांगणारा आहे.त्यांनी आपल्याभोवती जे काही घडते आहे ,भोवतीचे उद्योग,प्रक्रिया यांच्याशी शिक्षणाशी नाते जोडण्याचे काम केले आहे.विनोबानी सातत्यांने जे लेखन केले आहे ते प्राचीन वाडःमयाचे सार आहे.मात्र संदीप वाकचौरे यांनी त्यांच्याही विचाराचे विमर्श स्वरूपात केलेली मांडणी महत्वाची ठरते.वर्तमानात ही विचार छाया अधिक समृध्दता देईल असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेते मा.गिरीश प्रभुणे यांनी केले.

संदीप वाकचौरे लिखित व चपराक प्रकाशनाचे वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विनोबांची शिक्षणछाया या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी विवेकचे कार्यकारी संपादक रवींद्र गोळे,संमेलनाचे कार्यवाह नरेंद्र निकुंभ,प्रकाशक घनश्याम पाटील,लेखक जे.डी.पराडकर,मयूर बागूल उपस्थित होते.
प्रभुणे आपल्या भाषणात म्हणाले की, भारतात असलेल्या प्राचीन वाडःमयात शिक्षणाचा विचार प्रतिबिंबीत झालेला दिसतो.आपल्याकडील महाभारत,रामयाण,वेद,उपनिषदांमध्ये शिक्षणाचा दृष्टीकोन देणारे आहे.आपले ऋषी,मुनीची आश्रमाची प्राचीन परंपरा आहे.मधल्या काळात विद्यापीठे निर्माण झाली.त्याकाळत आचार्य पंरपरा निर्माण झाली.जे आचार्यांकडे जाऊन शिकून येईल आणि ज्यांनी प्रगती केली असा कोणीही आश्रम काढायचा.ती मोठी पंरपरा होती.तेव्हा आचार्य म्हणजे ब्राम्हण असा विचार नव्हता..कोणीपण आश्रम काढत होते.प्राचीन पंरपरेत शिक्षण आणि तत्वज्ञानाची परंपरा आहे..जन्माला ब्राम्हण नसणा-यांनेच देखील आचार्य म्हणून वाल्मिक.गांधीजीनी स्वातंत्र्यम मिळवले.गांधीजीच्या प्रयोगाची,शेती,उदयोग,शिक्षणातही प्रयोग केले.विनोबा हे आधुनिक महर्षी आहे.विनोबांनी रामायण,उपनिषदांचा अभ्य़ास करून सार रूपाने लेखन केले आहे.पूर्वी डेरेदार वृक्षाखाली आश्रम असायचे. विनोबांनी अनेक प्रयोग केले. विनोबांनी केलेले ग्रामीण उद्योग,आरोग्य, शिक्षणातील प्रयोग देखील उल्लेखनीय आहे.विनोबांनी शिक्षणाचा अत्यंत गंभीरपणे विचार केला.संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकाचे नाव छान आहे.डेरेदार वृक्षाखालीच सावली मिळते. वर्तमानात विनोबांच्या विचाराची छाया अधिक महत्वाची आहे. वाकचाौरे यांचे हे पुस्तक विनोबांच्या विचारांचे विमर्श,चर्चा करत पुढे जात आहे. त्यामुळे वर्तमानात हे पुस्तक विनोबाच्या जीवन भूमिकेचा विचार प्रतिपादन करत आहे.गांधीजी बुनियादी विचार विनोबांनी पुढे नेला आहे .आज राष्ट्रीय शिक्षण धोरण नव्याने येत असून हे पुस्तक वर्तमानात शिक्षणाच्या दृष्टीने पाठयपुस्तक ठरेल असे मत व्यक्त केले.
घनश्यामजी पाटील म्हणाले की,गेले वर्षभरात संदीप वाकचौरे यांचे शिक्षणावरील अनेक पुस्तक येत आहे.वाचकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला मिळत असून काही पुस्तकांच्या आवृत्या देखील संपल्या आहेत.येत्या काही महिन्यात आणखी नवे पुस्तके येतील.शिक्षणाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन या निमित्ताने समाजापुढे मांडण्याचे काम हे पुस्तक करत आहे.ही पुस्तके,पालक,शिक्षक यांच्या पंसतील उतरत असून शिक्षणाचा नवा दृष्टीकोन पेरत आहेत.ही पुस्तके चपराक करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे मत व्यक्त केले.संदीप वाकचौरे यांनी लेखनामागील प्रेरणा आणि भूमिका विषद केली तर मयूर बागूल यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button