धार्मिक

नवरात्र उत्सवाच्या  पार्श्वभूमीवर  कळसुबाई गडा ची राजूर पोलिसांनी केली पाहणी     

       

                     विलास तुपे

राजूर/प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर असणाऱ्या कळसुबाई शिखरा वर आगामी काळात साजरा होणा-या नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने  राजूर चे .पो. नि . प्रविण दातरे  यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गडाची सुरक्षा विषयक पाहणी केली

नवरात्र दरम्यान 5 वी, 6 वी, 7 वी तसेच 9 व्या माळीला शिखरावर 2 नंबर सिडी व 03 नंबर सिडी वर भाविकांची गर्दी होते त्याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये त्याकरिता योग्य तो पोलीस बंदोबस्त व योग्य मनुष्यबळ ठेवण्यात येणार आहे. तसेच ट्रेक दरम्यान काही रोलींग लोखंडी पाईप तुटलेले व काही नसल्याने त्याबाबत फॉरेस्ट विभागास माहिती दिली आहे.

       कळसुबाई शिखराच्या लगत असलेल्या मांची ठिकाणी नवरात्र अनुषंगाने मिटींग आयोजित केली व सदर मिटींगला कळसुबाई देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सदस्य, तसेच कळसुबाई यात्रा कमिटी बारी , जहागिरदार वाडी, सुव्यमसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, उपसरपंच पो कॉ.अशोक काळे, विजय मुंढे, डगळे उपस्थित होते.   सदर मिंटीग मध्ये

 आपले मंडळ ट्रस्ट ग्रामपंचायत आयोजकांकडून स्वयंसेवकांची नेमणूक करावी व त्यांना जबाबदारी निश्चित करून कामाची विभागणी करण्यात यावी. कळसुबाई पायथ्याशी

वाहने पार्कींग करिता जागेचे नियोजन करावे व यात्रे करीता लागणारे दुकाने स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्यात यावी. नवरात्र उत्सव दरम्यान दीपप्रज्वलन मोठ्या प्रमाणात करण्यात येते सबब रात्री   दिवसा करिता पुजारी/स्वयंसेवक नेमण्यात यावेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार करणार नाही. नवरात्र उत्सव दरम्यान लावण्यात येणारे फ्लेक्स/बॅनर यावरील मजकूर देखावा हा ग्रामपंचायत कडून खातरजमा करून व पोलिसांना कळविल्याशिवाय प्रिंट करून लावण्यात येऊ नये जेणेकरून कोणत्याही समाज/वर्गाची धार्मिक भावना दुखावले जाणार नाही.

 नवरात्र उत्सव दरम्यान भाविकांच्या जवळील मौल्यवान दाग दागिने पैसे यांची तसेच दानपेटीची चोरी होऊ नये याकरिता संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. याबाबत मार्गदर्शन करुन सुचना देण्यात आल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button