मोदींजींना धन्यवाद देण्यासाठी पुण्यात नमो बाईक रॅलीचे आयोजन
पुणे, ता. ७– प्रभू श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल ५०० वर्षाच्या संघर्षाची यशस्वी पूर्तता करून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा राममंदिराची उभारणी केली. त्यात श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना केली.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन तसेच श्रीरामललांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते श्री. सुनील विश्वनाथ देवधर यांच्या नेतृत्वात ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता, कृष्णसुंदर गार्डन, डीपी रोड, एरंडवणे, पुणे येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीत पुणेकर नागरिक बंधु- भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. देवधर यांनी केले आहे.
ही रॅली म्हात्रे पूल – शास्त्री रोड- माधवराव पेशवे रोड – बाजीराव रोड – शनिवार वाडा – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – एफ.सी. रोड – ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजीनीरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणी ती संपेल.
या रॅलीसाठी नागरिकांनी नोंदणी करणे अगत्याचे असून त्यासाठी त्यांनी https://www.namopune.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या बाईक रॅली तरूण- तरूणींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.
श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना स्थापना करून अखिल हिंदुस्थानाचे गर्वस्थान आणि अस्मिता असलेल्या त्यामध्ये केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश अमृतकाळाबरोबरच आता रामराज्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करू लागला आहे. अस मत ही देवधर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
..