इतर
पारनेर तालुक्यातील विवाहित तरुणी बेपत्ता

अकोले- लिंगदेव[ ता अकोले] येथील माहेर असलेले व पारनेर तालुक्यातील एक विवाहित तरुणी बेपत्ता झाली आहे गेल्या आठ दिवसांपासून हि तरुणी बेपत्ता आहे या तरुणीचे आजोबा व लिंगदेव गावचे माजी सरपंच गोविंद कातोरे यांनी हि माहिती
दिली
गेल्या काही दिवसांपासून तिचा शोध घेतला जात आहे मात्र तिचा तपास लागला नाही सीमा नामदेव कातोरे [वय १८ वर्ष ]रा लिंगदेव ठाकरवाडी ता अकोले
येथील या तरुणीचे पळशी ता पारनेर येथील राहुल दुधवडे या तरुणाशी पाच ते सहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता मात्र बेपत्ता होण्यापूर्वी आदल्या दिवशी पतिपत्नीचे भांडण झाल्याचे समजते त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता घरातून ती बेपत्ता झाली