शिवजयंती निमित्त आयोजित ‘बालशिवाजी वेशभूषा स्पर्धेस’उत्स्फूर्त प्रतिसाद.

.
‘
सोलापूर : पूर्वभागातील साखर पेठ येथील सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी मध्ये पार पडलेल्या बालशिवाजी स्पर्धेमध्ये वय वर्षे ५ ते १० या वयोगटातील मुलांनी आणि मुलींनी बालशिवाजी वेशभूषा करून स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सदर स्पर्धेत बाल शिवाजी वेशभूषा करून आलेल्या मुलांनी व मुलींनी भाषण तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर नृत्य सादरीकरण केले. शिवगर्जना तसेच पोवाड्याचे गायन केले. तसेच बरेच मुलांनी मावळे बनून व ‘रितिका कलागते’ या मुलीने जिजामाताची वेशभूषा करून नृत्य सादरीकरण केले.
या स्पर्धेमध्ये ‘विराट काकडे’ याने प्रथम क्रमांक, ‘विहान भालेराव’ याने द्वितीय क्रमांक, ‘स्वरूप पवार’ याने तृतीय क्रमांक मिळवून पारितोषिक मिळविले. तसेच हर्षवर्धन कलागते, आदर्शकुमार परळकर, अविरत बेनुरे, शुभ्रा परळकर, वैभव साठे, पार्थ क्षीरसागर, विराज सुरवसे इत्यादींनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. बक्षीस प्राप्त व सहभागी झालेल्या प्रत्येक मुलांना व मुलींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून तुकाराम जाधव, सारिका जाधव, अविनाश जतकर यांनी काम पाहिले. लोकेश केंचकुंडी, ऋषिकेश चिंता, वम्सीकृष्णा येमूल, सनी शहापूरकर, कार्तिकेय बटगिरी, श्रीनिल मोने, शौर्य दुधगुंडी यांच्यासह आदी मुलांनी मावळे बनून नृत्य सादर केले.