आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२३/०२/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०४ शके १९४५
दिनांक :- २३/०२/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति १५:३४,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति १९:२५,
योग :- शोभन समाप्ति १२:४८,
करण :- विष्टि समाप्ति २८:४६,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ११:१५ ते १२:४३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२१ ते ०९:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:४८ ते ११:१५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:१० पर्यंत,
❀ दिन विशेष:
कुलधर्म, भद्रा १५:३४ नं. २८:४६ प., मृत्यु १९:२५ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०४ शके १९४५
दिनांक = २३/०२/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आवडीचे गोड पदार्थ चाखाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सुखाचा आनंद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
वृषभ
तुमचा प्रभाव राहील. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आवाजात गोडवा ठेवाल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. चांगला आर्थिक लाभ होईल.
मिथुन
फार विचार करत राहू नये. ध्यानधारणा करावी. इतरांसमोर आपली कला सादर करता येईल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. वागण्यात धोरणीपणा दाखवाल.
कर्क
मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्या. जोडीदाराचे प्रभुत्व राहील. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. अती विचार करू नका. कफ-विकराचा त्रास जाणवेल.
सिंह
कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नवीन मित्र जोडले जातील. व्यावहारिक कुशलतेने वागाल. जोडीदाराशी मन-मोकळ्या गप्पा माराल.
कन्या
इतरांचा विश्वास संपादन करावा. वादाला बळी पडू नका. कामाचा जोम वाढेल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
तुळ
कामातील खाचा-खोचा जाणून घ्याव्यात. घाई घाईने निर्णय घेऊ नका. शेअर्स सारख्या कामांतून धनलाभ संभवतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. तोंडात साखर ठेवावी लागेल.
वृश्चिक
अविचाराला बळी पडू नका. उताविळपणे निर्णय घेतले जातील. कामाच्या ठिकाणी काहीशी प्रतिकूलता जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दृढ-निश्चय करावा लागेल.
धनू
कौटुंबिक चिंता सतावेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे. कामातून समाधान शोधाल. फसवणुकीपासून सावध राहावे.
मकर
मनातील अनामिक भीती काढून टाकावी. काही कामे खिळून राहू शकतात. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगावी लागेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. पैज जिंकता येईल.
कुंभ
घरातील वातावरण आनंददायी असेल. गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकाल. कामातील बदल ध्यानात घ्या. आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करावा. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
मीन
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांना नाराज करू नका. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामाची योग्य पोच-पावती मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर