इतर

वीज कंत्राटी कामगारांचा एन एम आर मागणी साठी पुण्यात संप सुरू

पुणे दि 28

महावितरण,महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे, या पार्श्वभूमीवर 5 टप्पा गाठला आहे या वेळी 48 तासांचा लाक्षणिक बंद आंदोलन चालू झाले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील महानिर्मीती, महापारेपण, महावितरण व मुंबई मधील मुख्य कार्यालय कामगार सहभागी झाले आहे.

या लाक्षणिक बंद चा संदेश राज्य सरकार, मा उर्जा मंत्री, प्रशासनाने घेवून कामगारांना एन एम आर माध्यमातून कायम नोकरीत समाविष्ट करावेत अन्यथा दि 5 ता पासून बेमुदत काम बंद आंदोलन अटळ आहे. असा ईशारा कृती समिती चे पदाधिकारी नीलेश खरात यांनी रास्ता पेठ कार्यालय समोर आंदोलना मध्ये दिला आहे.

कामगार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य चे कामगार उपायुक्त (औस) मा.संतोष भोसले यांनी तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीला सोमवार दि 26 फेब्रवारी 2024 रोज़ी प्रशासन च्या नकारात्मक भूमिका मुळे बैठक अयशस्वी झाली होती.
या बैठकीत मध्ये कृती समिती ने खर्चात बचती चा प्रस्ताव ही फेटाळला होता .
वीज उद्योगातील सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार दिल्यास प्रशासकीय खर्चात दर वर्षी सुमारे 2 अब्ज 32 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत पडू शकतात. या साठी कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, पगार वाढ करावी व वयाच्या 60 वर्षा पर्यंत रोजगार द्यावा या व अन्य महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात 9 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात आंदोलन चालू आहे.


हे सनदशीर मार्गाने चाललेले आंदोलन दडपण्यासाठी कंत्राटदार च्या माध्यमातून अशिशीक्षत, अनुभव नसलेल्या, पोलिस व्हेरीफीकेशन न करता कामगारांना कामाला लावण्याचे बेकायदेशीर प्रयत्न चालू आहेत. सदरील कामगारांना अनुभव नसल्याने वीज ऊद्योगात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कामगारांच्या मनात अंसंतोष निर्माण झाला आहे. तरी प्रशासन ने बेकायदेशीर कृती त्वरित बंद करून कृती समिती पदाधिकारी समावेत सकारात्मक चर्चा करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कृती समिती संघटक सचिन मेंगाळे यांनी केलेली आहे.
राज्यभरात एकूण 27 संघटनेचे कामगार आंदोलनात उतरले आहेत.

या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय मजदूर संघ चे केंद्रीय पदाधिकारी अण्णा धुमाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, उमेश विस्वाद , कामगार महासंघाचे सुरेश जाधव, वर्कर्स फेडरेशन चे पोहेकर, विषेश उपस्थित होते.
आजच्या मिटिंग निलेश खरात, सचिन मेंगाळे, राहूल बोडके, उमेश आणेराव , निखिल टेकवडे, प्रवीण पवार, मार्गदीप मस्के, अशोक गहिने, रामदास खराडे व मंगेश कोहीनकर आदी पदाधिकारी यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
मा.ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सुचनाकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची भावना सर्व संघटनांची असून ऊर्जामंत्री कामगार मंत्री, प्रधान सचिव ऊर्जा व प्रधान सचिव कामगार यांनी मिटिंग घेऊन कायम स्वरूपी तोडगा काढावा राज्यात कंत्राटी कामगारांच्या हितार्थ हरियाणा पॅटर्न चालू करावा अशी अपेक्षा संयुक्त कृती समितीने आज विविध ठिकाणी झालेल्या मिटींग मधे व्यक्त केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button