साधक जीवनावर आधारित निबंध स्पर्धा
रायगड-साधकाचे आचरण आणि जीवन व्यवहार कसा असावा, याचा मागोवा घेणारी खुली निबंध स्पर्धा ‘पू. बाबामहाराज आर्वीकर यांची साधक विहार सूत्रे’ या विषयावर आयोजित करण्यात आली आहे. निबंध प्रामुख्याने पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या ‘साधक विहार सूत्रे’ या ग्रंथातील बोध यावर आधारित असावा. अन्य पूरक संत साहित्याचा उपयोग करता येईल. निबंधाला शब्दमर्यादेचे बंधन नसले तरी अनावश्यक पसाराही नसावा.
या स्पर्धेसाठी पाच हजार रूपयांचा प्रथम, तीन हजार रूपयांचा द्वितीय, दोन हजार रूपयांचा तृतीय पुरस्कार दिला जाईल. प्रत्येकी एक हजार रुपयांचे तीन उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील.
स्पर्धेच्या अन्य नियम व तपशीलांसाठी इच्छुकांनी ९९२०७ ८५०४६ (श्री. विवेक गुरव कोल्हापूर ), ९९३०८ ६४७१२ (भैरवी श्रोत्री पुणे ) वा ९६६४४ ९९८१० (श्री. श्रीधर मोहोळकर नवी मुंबई) यांच्याशी मेसेज द्वारा संपर्क साधावा. ही विनंती.