इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०९/०३/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १९ शके १९४५
दिनांक :- ०९/०३/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३६,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति १८:१८,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति ०७:५५, शततारा २८:५६,
योग :- सिद्ध समाप्ति २०:३२,
करण :- विष्टि समाप्ति ०८:१०, चतुष्पाद २८:२५,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – पू.भा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चतुर्दशी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:४१ ते ११:११ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:१२ ते ०९:४१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०९ ते ०३:३८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा ०८:१० प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १९ शके १९४५
दिनांक = ०९/०३/२०२४
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा.

वृषभ
आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल. नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल.

मिथुन
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.

कर्क
जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. आधुनिक विचार आमलात आणून पहावेत. कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नावलौकिकास पात्र व्हाल.

सिंह
गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. उगाचच विवंचना लागून राहील. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा.

कन्या
अत्यंत व्यवहारीपणे वागाल. मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

तूळ
घरातील ज्येष्ठांचा आदर करावा. जवळचा प्रवास जपून करावा. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. आळस बाजूला सारावा लागेल.

वृश्चिक
शांत व खोलवर विचार करावा. काही गोष्टींचे मनन करावे लागेल. चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत. अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील.

धनू
चांगला आर्थिक लाभ होईल. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल. स्वकष्टावर अधिक लक्ष द्याल. काटकसरीने वागणे ठेवाल. शक्यतो मोजकेच शब्द वापरावेत.

मकर
चटकन निराश होणे टाळावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे. स्त्रियांवरून वाद वाढू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ
काही गुणांना उशिरा वाव मिळेल. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. वेळेचे बंधन पाळावे.

मीन
कामाची दगदग जाणवेल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. कष्टाची योग्य किंमत जाणाल. सतत धडपड करत राहाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button