फालुदा खाल्याने कोतुळ येथे अनेकांना विष बाधा

कोतुळ दि 11
फालुदा खाल्ल्याने विष बाधा झाल्याची घटना कोतुळ येथे घडली आज दुपारी ही घटना घडली येथील ग्रामीण रुग्णालयात बाधित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे
चार रुग्णा वर उपचार सुरू आहे
सलग दोन दिवस सुरू असलेल्या या प्रकाराकडे मात्र अन्न भेसळ प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे याबाबतची माहिती अशी की ब्राह् कोतुळ- ब्राह्मणवाडा रस्त्यावर पेट्रोल पंपा जवळ असणाऱ्या एका थंडपेय विक्रीच्या हात गाडीवर फालुदा व आईस्क्रीम खाल्ल्याने अनेक जणांना विष बाधा झाली फालूदा खाल्ल्याने अनेकांना उलट्या मळमळी सुरू झाली काल रविवारी तसेच आज सोमवारी देखील हा प्रकार झाला दिवसभरात या गाडीवर येणाऱ्या अनेक ग्राहकांनी फालुदाचा आस्वाद घेतला मात्र त्यानंतर काही तासातच त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला सलग दोन दिवस हा प्रकार घडत असताना देखील पोलीस व अन्नभेसळ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले यामुळे अनेकांना

रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला काल असंख्य ग्राहकांनी या हातगाडीवर फालुदाचा आस्वाद घेतला आणि आज देखील असंख्य ग्राहकांनी फालुदाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांना हा त्रास सुरू झाला या रस्त्यालगत च्या परप्रांतीय मजुरांनी थंड पेयाचा आस्वाद घेतला लहान मुले असल्याने त्यांना जास्त त्रास जाणवला दुपारी दोन वाजता आस्वाद घेतल्यानंतर काही वेळाने यांना त्रास सुरू झाला गणेश वासकेले(५) अनुराधा सोळंके(३) अमोल भवर(३४) यांनी दुपारी दोन वाजता या ठिकाणी फालुदा खाल्ला त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला त्यांना प्रथमतः एका खाजगी रुग्णालयात नेले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात हलविले त्यांच्यावर त्यांच्यावर कोतुळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे

दरम्यान उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने राजस्थानी लोकांच्या थंड पेय आईस्क्रीम विक्री च्या हात गाड्या गल्लोगल्ली दिसत असल्याने गाड्यांवर लोकांची वर्दळ वाढली आहे या संधीचा फायदा घेत विक्रेते भेसळयुक्त पदार्थ विकत असल्याने असे प्रकार होतं आहे
मात्र अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकार लोकांच्या जीवाशी घेतला जात आहे अशा प्रकार वारंवार होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे
