संगमनेरात भगव्या मोर्चाला अटी आणि शर्तीची वेेेेसन घालत पोलिसांची परवानगी

पोलिसांचा मोठा फ़ौज फाटा तैनात
संगमनेर : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मंगळवारी संगमनेरात निघणाऱ्या भगव्या मोर्चाला संगमनेर शहर पोलिसांनी काही अटी आणि शर्तीची वेसन घालत परवानगी दिली आहे. त्यामुळे मोर्चा विराट होण्याची शक्यता असून संगमनेर शहर भगव्या वादळाने व्यापून जाणार आहे. त्यामुळे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
रविवार दि.२८ मे रोजी जोर्वे नाका परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाने आपली वज्रमुठ पक्की करत आज मंगळवारी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त साधत भगव्या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात तालुक्यासह शेजारच्या अकोले तालुक्यातूनही लोक येणार असल्याची शक्यता आहे. अनेक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेत जोर्वे नाका परिसरातील घटनेचा निषेध करतानाच आज निघणाऱ्या भगव्या मोर्चाचे समर्थन केले असून तालुक्यातील बरीच गावे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान या भगव्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या संगमनेर दाखल झाल्या आहेत. दंगल नियंत्रण पथकासह धडक कृती दलाचे जवान आणि पाचशे पोलिसांचा बंदोबस्त या मोर्चासाठी तैनात करण्यात आला आहे.
:- या मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी आणि संघटनेची सबंध नसून हिंदू समाजावरील वाढते हल्ले आणि लव्ह जिहाद सारख्या घटनांच्या विरोधात हा मोर्चा आहे, या मोर्चातून कोणत्याही धर्माला अथवा समाजाला लक्ष करण्याचा हेतू नाही, केवळ अशा प्रकारच्या विघातक प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा असून या मोर्चादरम्यान ठरलेल्या घोषणाशिवाय अन्य घोषणा देता येणार नाहीत असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
सकल हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने संगमनेर अकोला उद्या बंद
संगमनेर येथे जोर्वे नाक्यावर झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद संगमनेर शहरासह तालुका आणि अकोले शहर व तालुक्यासह चांगलेच उमटले असून त्यासाठी संगमनेर शहर अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटनेने एकतेचा नारा देत धर्म समाजाच्या विरोधात नसलेला हा मोर्चा जिहादच्या विरोधात आहे. असे भगवा मोर्चाचे आयोजक कुलदीप ठाकूर अक्षय थोरात मयूर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले या मोर्चाला संगमनेर शहरातील 64 ग्रामपंचायतीने ठराव संमत करून सहभाग दर्शविला असून तुला शहरासह तालुका सुद्धा या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना ठाकूर म्हणाले की २८६ सेवक या मोर्चाची काळजी घेणारा असून राजकारण पदाधिकारी नेते विरहित हा मोर्चा असणार आहे हिंदू समाजाच्या गोंधळ झालेल्या भावना याचा उद्रेक म्हणून एक हिंदू म्हणून सभी हिंदू संघटनेने या मोर्चा सहभागी होणार आहे अंतर्मनात असलेली खदखद बाहेर पडली असून त्या हाकेला अनेक समाजाने साथ ही दिली. या मोर्चात 190 गाव बंद सहभागी होणार असल्याचे सांगत तब्बल २० विविध समाज संघटनेने या बंदला पाठिंबा दिलेला आहे. या मोर्चामध्ये वीस ते बावीस हजार जनसह लाभ नारा देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या मोर्चामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून सुरेश चव्हाणके शंकरराव गायकर विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय मंत्री हे उपस्थित राहणार आहे विशेष म्हणजे महिलाही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे मोर्चामध्ये आरोग्य ॲम्बुलन्स फायर ब्रिगेड नगरपालिकेचे पार्किंग आधीची व्यवस्था केलेली असून शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघणार असून एक आदर्श मोर्चा म्हणून संगमनेर मध्ये निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.