मनोरंजन

जन्मऋण’चे गुपित २२ मार्च २०२४ ला चित्रपटगृहात पहा!

आभाळमायातील मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी यांचा काळजाला भिडणारा अभिनय!

मुंबई: लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या सुसंस्कृत मराठमोळ्या कुटुंबात घडलेल्या सत्यघटनेवर त्यांनी ‘जन्मऋण’ या नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनोरंजनातून प्रभोधन करीत थेट प्रेक्षकांच्या काळजात स्थान मिळविण्यासाठी ‘आभाळमाया’ या पहिल्या लोकप्रिय दैनंदिन मालिकेतील जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची साथ त्यांना लाभली आहे.

आज निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. ‘जन्मॠण’ हा नवीन चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना ‘कलम-5’ तर्फे तुरुंगवासही भोगाव लागतो. समाजात आपल्या आई-वडिलांना प्रेमाने व आदराने आपल्या मुलांनी वागवावे केवळ याच एका सद्भावनेने या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केलेले आहे. आतापर्यंत आपण त्यांना चित्रपटाच्या व दूरदर्शनच्या माध्यमातून ओळखतो एक सकस कलाकृती घेऊन त्या तुमच्या भेटीला २२ मार्चपासून येत आहेत.

‘गणेश फिल्म्स’ निर्मित आणि ‘श्री. अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत ‘जन्मऋण’ चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के., अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूर, निहारिका रायजादा यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते

मोऱ्या‘ २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळतेलगूकन्नडहिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार!

मुंबई : शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा मोऱ्या हा अत्यंत वेगळा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तमाम रसिकांमध्ये मोऱ्या बद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले आहे.

एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय तंतोतंत सफाई कर्मचाऱ्यांचं आयुष्य उभं करतं. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक – संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. संगीतकार-अमोघ इनामदार, गायक अवधूत गुप्ते तर DOP आकाश काकडे आहेत. सहाय्यक दिग्दर्शन श्रेयस गौतम, करण मोरे यांचे आहे. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा ‘मोऱ्या’ २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी पहावा आणि मराठी अस्मिता जागवावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button