आजचे पंचांग व राशिभविष्य दि .१८/०३/२०२४
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २८ शके १९४५
दिनांक :- १८/०३/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३९,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति २२:५०,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति १८:११,
योग :- सौभाग्य समाप्ति १६:३६,
करण :- बालव समाप्ति १०:१७,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मीन – पू.भा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:०६ ते ०९:३७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:३६ ते ०८:०६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:३७ ते ११:०७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:३९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २८ शके १९४५
दिनांक = १८/०३/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक उठाव येईल. तरुणांच्या संगतीत दिवस घालवाल. लहान मुलांच्यात खेळाल. चौकसपणा दाखवाल. तुमच्यातील भावनाशीलता दिसून येईल.
वृषभ
अधिकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. स्वत:चा मान राखून वागाल. मुलांचे मत विचारात घ्यावे. कमिशन मधून फायदा मिळेल.
मिथुन
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल. सहकुटुंब मौज-मजेचा बेत आखाल. हातातील अधिकार वापरण्याची संधि मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलाल.
कर्क
सर्वासमोर आपली कला सादर करता येईल. घरासाठी सजावटीचे सामान खरेदी केले जाईल. टाप-टिपीकडे अधिक लक्ष द्याल. स्वत:चा मान वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.
सिंह
पोटाची तक्रार जाणवेल. वात-विकाराकडे दुर्लक्ष करू नका. योग्य संधीची वाट पाहावी. सहकुटुंब प्रवास कराल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
कन्या
अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.
तूळ
प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. भागीदारीच्या व्यवसायाला अधिक गती येईल. संपर्कातील लोकांशी एकोपा वाढेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मौज-मजेकडे कल राहील.
वृश्चिक
हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. कामे वेळेत पूर्ण करता येतील. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. उगाचच चीड-चीड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
धनू
आवडते पुस्तक वाचायला मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बुद्धी आणि ज्ञान ह्यांचा सुयोग साधाल. चौकसपणे माहिती गोळा कराल. भावंडांची उत्तम साथ मिळेल.
मकर
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. काम आणि वेळ ह्यांचा समन्वय साधावा. रागावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. तीर्थयात्रेसाठी नाव नोंदवाल.
कुंभ
अघळपघळ बोलणे टाळा. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. हस्तकलेचा प्रसार करता येईल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. थोर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल.
मीन
मानसिक शांतता जपावी. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मुलांच्या आनंदात रमून जाल. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवसभर घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर