आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२०/०३/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ३० शके १९४५
दिनांक :- २०/०३/२०२४,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३९,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २६:२३,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति २२:३८,
योग :- अतिगंड समाप्ति १७:००,
करण :- वणिज समाप्ति १३:२०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३७ ते ०२:०७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:३४ ते ०८:०५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:०५ ते ०९:३५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:०६ ते १२:३७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:३९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
आमलकी एकादशी, मेषायन ०८:३६, घबाड २६:२३ नं., भद्रा १३:२० नं. २६:२३ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ३० शके १९४५
दिनांक = २०/०३/२०२४
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. खाण्या-पिण्याची हौस भागवाल. मनाजोगा आर्थिक लाभ होईल. गायन कलेत प्रगती होईल. घरासाठी काही वस्तु खरेदी कराल.
वृषभ
आवडत्या कामात गुंग व्हाल. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. महिलांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीत दिवस घालवाल.
मिथुन
मानसिक चंचलतेला आवर घालावी. ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल. एखादी चांगली संधि चालून येईल. दानधर्म करण्याचा योग येईल. तीर्थ यात्रेसाठी नाव नोंदवाल.
कर्क
तुमची समाजप्रियता वाढेल. मित्रपरिवारात वाढ होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
सिंह
कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. कामात स्थिरता ठेवावी. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. कामाच्या ठिकाणी विश्वास संपादन कराल. काही चांगल्या गोष्टी अनुभवास येतील.
कन्या
धार्मिक कामात प्रगती कराल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. काही चांगल्या संधी चालून येतील. मुलांच्या व्रात्यपणाकडे लक्ष द्यावे. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल.
तूळ
अचानक धनलाभ होईल. लॉटरी मधून आर्थिक गरज भागेल. काही गोष्टी सहज घडून येतील. दिवस काहीसा आळसात घालवाल. फार हुरळून जाऊ नका.
वृश्चिक
उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस मौज-मजेत जाईल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. तुमच्या संपर्क कक्षा रुंदावतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.
धनू
कामात काही क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामगारांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. दिवस समाधानात जाईल. आरोग्यात सुधारणा होईल.
मकर
बुद्धीचा सदुपयोग कराल. शैक्षणिक कामे सुरळीत पार पडतील. प्रेमसौख्याला बहर येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. जुगारात चांगला धनलाभ संभवतो.
कुंभ
शांत झोपेचा अनुभव घ्याल. घराची छान सजावट कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. दिवस सुख-शांतीत जाईल.
मीन
प्रवासाची आवड पूर्ण कराल. वैचारिक दृष्टीकोन सुधारेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य लाभेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर