इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि२२/०३/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०२ शके १९४५
दिनांक :- २२/०३/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३९,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी अहोरात्र,
नक्षत्र :- मघा समाप्ति २८:२८,
योग :- धृति समाप्ति १८:३५,
करण :- कौलव समाप्ति १८:०१,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वृद्धिदिन,

✿राहूकाळ:- सकाळी ११:०५ ते १२:३६ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:०३ ते ०९:३४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:३४ ते ११:०५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
प्रदोष, घबाड २८:२८ नं.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०२ शके १९४५
दिनांक = २२/०३/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
जवळची प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था वधू शकते. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावा. तरूणांशी मैत्री कराल.

वृषभ
तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. फॅशनची हौस पूर्ण कराल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.

मिथुन
मनातील संभ्रम दूर करावेत. सरकारी कामे वेळ लावू शकतात. वाताचा त्रास जाणवू शकतो. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. वारसाहक्काची कामे चिघळू शकतात.

कर्क
भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.

सिंह
मनातील इच्छा पूर्ण होईल. अंगीभूत कलेला प्रोत्साहन मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी सल्ला मसलत कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

कन्या
जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल. कामातील द्विधावस्था त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.

तूळ
घरगुती परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रलोभनापासून दूर राहावे. कामात आळस आड येऊ शकतो. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.

वृश्चिक
साहस करताना सावधानता बाळगावी. योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल.

धनू
कौटुंबिक प्रश्न शांततेने सोडवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते. स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कायदेशीर कामात वेळ जाईल. नवीन मित्र जोडाल.

मकर
प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अघळ पघळ गप्पा माराल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा. चिकाटी सोडून चालणार नाही.

कुंभ
हजरजबाबीपणे वागाल. सामुदायिक वादांपासून दूर राहावे. धार्मिक यात्रेचे योग येतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मीन
श्रम काही प्रमाणात वाढू शकतात. कागदपत्रे जपून ठेवावीत. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button