कळस बु येथील श्री. मधुकर लक्ष्मण वाकचौरे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
कळस बू सोसायटीचे माजी सचिव व जयकिसान सह दूध उत्पादक संस्थेचे माजी संचालक श्री. मधुकर लक्ष्मण वाकचौरे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. ते भाऊ नावाने परिचित होते.
ठाणे महानगरपालिका च्या नगरसेविका आशा डोंगरे, पुणे येथील डेट वायलर स्विस टेक्निकल कंपनी मध्ये प्रोड्क्शन मॅनेजर असणारे श्री. संजय वाकचौरे, विजय वाकचौरे यांचे ते वडील तर जयकिसान दूध संस्थेचे व्हा. चेअरमन अशोक वाकचौरे, प्राथमिक शिक्षक तुकाराम वाकचौरे यांचे बंधू तर उद्योजक संतोष वाकचौरे, मराठा महासंघ नगर चे अध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांचे चुलते तर ठाणे शिवसेना नेते संदीप डोंगरे यांचे सासरे होते.
कळस बू येथील प्रवरा तिरी त्यांचे वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
——–