महिलांसाठी विनामूल्य ‘पौरोहित्य’ वर्ग वर्गाचे आयोजन

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन
आणि पद्मशाली सखी संघमचा उपक्रम
सोलापूर –दि 22
अनेक मोठ – मोठे व्यवसाय आणि व्यवहारात पुरुषांसारखेच महिला आघाडीवर आहेत. संधी मिळाले की, सोन्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्नशील असतात. महिला नाहीत, असे कुठले क्षेत्र नाही. पौरोहित्य शिकून विविध ठिकाणी पुरोहिताचे कार्य करता येतो, या क्षेत्रात महिला कमी असल्याने सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमच्या वतीने फक्त महिलांसाठी विनामूल्य (नि:शुल्क) पौरोहित्य वर्ग ३१ मार्च पासून सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी आणि ॲड.रेखा गोटीपामूल यांनी दिल्या आहेत.
पूर्व भागातील श्रीराम मंदिर येथे रविवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पौरोहित्य वर्गाचे शुभारंभ करण्यात येत आहे. यापुढे दर रविवारी असणार असून पौरोहित्यामध्ये पीएचडी मिळवलेल्या डॉ. अपर्णा कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून इच्छुक महिलांनी 9021551431 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत तसेच पूर्व नांवनोंदणी आवश्यक असून नोंदणी केलेल्यानाच प्रवेश मिळेल, असे आवाहन फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, वैकुंठम् जडल, श्रीनिवास पोटाबत्ती आणि पद्मशाली सखी संघमच्या उपाध्यक्षा जमुना इंदापूरे, सहसचिवा ममता तलकोकूल, खजिनदार दर्शना सोमा, सहखजिनदार लक्ष्मी कोडम, कार्याध्यक्षा वरलक्ष्मी गोटीपामूल, समन्वयिका अरिता इप्पलपल्ली, अंबुबाई पोतू, सुनिता क्यामा (निलम), कला चन्नापट्टण, भाग्यश्री पुंजाल, लता मुदगुंडी, पल्लवी संगा, आरती बंडी, संगीता रॅकम यासह आधी सखींनी केल्या आहेत. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम होत आहे. यावेळी कोंडा म्हणाले, महिलांमध्ये धार्मिक भावना अधिकाधिक जागृत होण्याच्या दृष्टीने पौरोहित्य वर्ग घेण्यात येत असून तसेच त्यांना पौरोहित्यामुळे स्वंयरोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.