आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२५/०३/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०५ शके १९४५
दिनांक :- २५/०३/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४०,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति १२:३०,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति १०:३८,
योग :- वृद्धि समाप्ति २१:३०,
करण :- बालव समाप्ति २५:४५,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- बुध – मेष २६:५७,
शुभाशुभ दिवस:- करिदिन वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:०१ ते ०९:३३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:३० ते ०८:०१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:३३ ते ११:०४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०९ ते ०६:४० पर्यंत,
❀ दिन विशेष:
धूलिवंदन, करिदिन, मन्वादि, अन्वाधान, प्रतिपदा श्राद्ध,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०५ शके १९४५
दिनांक = २५/०३/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
कौटुंबिक प्रगतीचा विचार कराल. हातातील कामात यश येईल. एखादी नवीन संधी चालून येईल. नवीन मित्र जोडाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका.
वृषभ
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. दिवस चैनीत घालवाल. निसर्ग सान्निध्यात रमून जाल. घरात कर्तेपणाचा मान मिळेल. तिजोरीत भर पडेल.
मिथुन
सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. घरातील लोकांच्यात वेळ घालवाल. आवडी-निवडीबद्दल दक्ष राहाल. घरातील कामात हातभार लावाल. पत्नीची प्रेमळ साथ मिळेल.
कर्क
आपल्याच मर्जीने वागणे ठेवाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. तुमच्यातील अरसिकता वाढेल. वादाचा मुद्दा उकरून काढू नका. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी.
सिंह
वैचारिक स्थैर्य जपावे. अडचणीवर मात करता येईल. मानसिक उभारी ठेवावी लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. फार विचार करत बसू नका.
कन्या
जोडीदाराचे वर्चस्व राहील. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. सामाजिक कामात हातभार लावाल. तुमची सामुदायिक प्रतिष्ठा वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
तूळ
घरगुती कलह वाढू देऊ नका. सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. अती अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
वृश्चिक
भावंडांना मदत करावी लागेल. मित्रांचे सहकार्य घ्यावे लागेल. नातेवाईक नाराज होऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.
धनू
हातातील कामे खोळंबू शकतात. कौटुंबिक अडचण सोडवता येईल. जुगारातून लाभ संभवतो. फसवणुकीपासून सावध राहा. आर्थिक उलाढाली सजगतेने कराव्यात.
मकर
कामाचा उत्साह कायम ठेवावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पीत्त विकार बळावू शकतात. कामातील प्रतिकूलता प्रयत्नाने दूर करावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.
कुंभ
अघळ-पघळ गप्पा माराल. वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. कामाचा फार ताण घेऊ नये. जबाबदारी उत्तम रित्या पेलाल. घराची स्वच्छता काढाल.
मीन
इतरांशी वाद वाढू शकतो. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठांना नाराज करू नका. मनाजोगी खरेदी करता येईल. घराबाहेर वावरतांना सावध राहावे लागेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर