कोतुळ येथील शाहीर कैलास अटक यांना राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार!

अकोले प्रतिनिधी
कोतुळ येथील लोक शाहीर कैलास अटक यांना फिल्म बुलडाणा सोसायटी चा
राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार-2024 जाहीर झाला आहे
संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने
आपल्या देशाच्या नाव लौकीकासाठी, विकास कार्यासाठी आपले लोककला या क्षेत्रातील योगदान कार्याला दृष्टीगत करून बुलढाणा फिल्म सोसायटीचा राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार 2024 सन्मानपूर्वक
प्रदान करण्यासाठी आपल्या नावाची निवड केली असल्याचे कळविले आहे .
कैलास अटक यांना हा पुरस्कार दिनांक
07/04/2024 रोजी पत्रकार भवन बुलढाणा येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात सन्मानपूर्वक
प्रदान केला जाईल पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाआपल्याला लवकरच पाठवण्यात येईल ..
आपण केलेले कार्य म्हणजे आपल्या देशाच्या नावलौकिकात खोवलेला मानाचा तुरा, आपल्या कार्यामुळे देशवासीयांना प्रेरणा मार्गदर्शन, नवे परिवर्तनवादी विचार मिळालेले आहेत आपण म्हणजे
आपल्या भारत देशाची विशेष ओळख ! देशाच्या कला संस्कृतीचा गौरव !! हा गौरव देशवासीयांच्या समोर
नव्या रूपाने साकार करण्यासाठी आपणास दिला जाणारा सन्मानपूर्वक राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार 2024
!!! आम्हाला आशा आहे की आपण पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमास येऊन राष्ट्रीय गौरव
पुरस्काराचे देशाच्या पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी सह्योग प्रदान कराल.
पुरस्कारासाठी आपली निवड झाली असल्याचे सुरज भास्कर वाडेकर यांनी एक पत्राद्वारे कळविले आहे