दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रावर सोयी सुविधा द्या – चांद शेख

तहसीलदार यांना सावली दिव्यांग संघटनेचे निवेदन
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ मधील सर्व २१ प्रकारच्या दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये १०० % सहभाग व सुलभतेने मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर विविध प्रकारच्या सोयी सुविधा पूरवणेबाबत काही मागण्याबाबत सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार शेवगाव यांच्याकडे मागणी केली आहे.
त्यामध्ये दिव्यांग मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची ईच्छा असल्यास केंद्रनिहाय अधिकाऱ्यांमार्फत विहित नमुन्यातील अर्जाचे वाटप दिव्यांग मतदारांच्या घरोघरी वाटप करण्यात यावे.सक्षम अँपची मोठ्या प्रमाणावर जन जागृती करण्यात यावी.मतदानाच्या रांगेत दिव्यांगांना प्राधान्य देणेबाबत उपाययोजना करण्यात याव्यात दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवने व मतदान झाल्यानंतर घरापर्यंत पोहोचवनेबाबत नियोजन करण्यात यावे. मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दिव्यांग मतदारांबाबत संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.मतदान केंद्र परिसरात दिव्यांग मतदारांना बसण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणेबरोबर त्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना बसण्याची जागा आशा आशयचा फलक दर्शनी भागात लावण्यात यावा. मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, वैद्यकीय सुविधा,मदत केंद्र,सुलभ सौचालय, मतदान प्रक्रियेविषयी माहिती देणारे फलक आदी बाबीबरोबर विशेष लक्ष देण्यात यावे. मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींना सोयी सुविधेचा अभाव वाटल्यास तसेच कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास मतदान केंद्रावर तक्रार नोंदवही ठेवण्यात यावी त्याच बरोबर तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आशा विविध मागण्याबाबत निवेदन नायब तहसीलदार शशिकांत देऊळगावकर यांच्याकडे सावली संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी निवेदन दिले. निवेदन देतांना तहसील कार्यालय शेवगाव लिपक सुरेश बर्डे तसेच सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव शहर उपाध्यक्ष सुनिल वाळके उपस्थित होते. दिव्यांग मतदारांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सावली दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी नवनाथ औटी, संभाजी गुठे, मनोहर मराठे, खलील शेख, अनिल विघ्ने, गोवर्धन वांढेकर, ताराचंद पिवळ, गणेश महाजन, गणेश तमानके, गणेश त्रिकोणे, शिवाजी आहेर, नंदकिशोर चिंतामणी, मनोज गोर्डे, अमोल गारपगारे, अतिष अंगरख, किशोर मडके, विजय आंधळे, महबूब सय्यद, सोनाली चेडे, सकू मिसाळ, वंदना तुजारे, शेवगाव तालुक्यातील आदी दिव्यांग बांधवाकडून मागणी करण्यात येत आहे.
दिव्यांग व्यक्तींना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये १०० % सहभाग होणेसाठी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर प्राधान्याने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
चांद शेख
अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगाव