प्रा. सरला तुपे यांना पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी!

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या व लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरानगर ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला,विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात पदव्यूत्तर हिंदी विभागातील सहाय्यक प्राध्यापक सरला सुर्यभान तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यावाचस्पती पदवीने गौरविण्यात आले.
सरला तुपे यांनी धीरेंद्र अस्थाना के कथा साहित्य में स्त्री विमर्थ या विषयावर शोध निबंध सादर केला होता.त्यांना के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.जिभाऊ मोरे,बिटको महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.अशोक धुलधुले यांचे मार्गदर्शन लाभले.सरला तुपे यांनी आजवर राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय स्तरावरती सोळापेक्षा अधिक शोधनिबंध सादर केले आहे.त्यांच्या यशाबददल प्रवरा ग्रामीणचे अध्यक्ष माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे,शालीनीताई विखे,खा. डॉ.सुजय विखे, संस्थेचे प्राचार्य,प्राध्यापक आंदिनी अभिनंदन केले आहे.