राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १२/०४/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २३ शके १९४६
दिनांक :- १२/०४/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४४,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति १३:१२,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति २४:५१,
योग :- सौभाग्य समाप्ति २६:१३,
करण :- बव समाप्ति २४:३३,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५६ ते १२:३० पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३० ते ०२:०४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, गणपतीला दवणा वाहणे, लाडूचा नैवद्य समर्पण करणे, भद्रा १३:१२ प., यमघंट २४:५१ प., पंचमी श्राद्ध,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २३ शके १९४६
दिनांक = १२/०४/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
सेवावृत्तीने कामे हाती घ्याल. फक्त स्वत:चा विचार करू नये. कौटुंबिक प्रेम वाढीस लागेल. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात.

वृषभ
तुमची धार्मिकता वाढीस लागेल. आत्मविश्वासाने कामे हाती घ्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. हसत-खेळत कामे कराल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल.

मिथुन
घाई घाईने कामे उरकाल. एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. व्यावसायिक लाभाकडे विशेष लक्ष ठेवावे. चोरांपासून सावध राहावे. क्षणिक आनंद उपभोगाल.

कर्क
तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. कामात मित्रांची मदत होईल. नवीन ओळखी वाढतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. हातातील कामात यश येईल.

सिंह
वडीलांची उत्तम साथ मिळेल. पारंपरिक कामात प्रगती कराल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

कन्या
हातून एखादे सत्कार्य घडेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधि चालून येईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

तूळ
अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वैचारिक शांतता जपावी.

वृश्चिक
वैवाहिक सौख्याला बहर येईल. सहकुटुंब प्रवासाचा आनंद घ्याल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. जवळचे मित्र गोळा कराल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

धनू
घरी जवळचे नातेवाईक गोळा होतील. जवळच्या लोकांशी हितगुज कराल. मानसिक शांतता शोधाल. पत्नीची बाजू समजून घ्यावी. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल.

मकर
फार अट्टाहास करू नका. जुन्या गोष्टींनी खिन्न होणे टाळावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्यावा. सरकारी कामात प्रगती होईल. जोडीदाराचे कौतुक कराल.

कुंभ
बोलण्यातून इतरांच्या मनाचा ठाव घ्याल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. चौकसपणे कामाच्या बाबी जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडावेत.

मीन
आवडते पुस्तक वाचाल. सखोल विचारांती निर्णय घ्याल. तुमची वैचारिक उत्क्रांती होईल. भावंडांचे सौख्य लाभेल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button