बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य हे दूध उत्पादक शेतकऱ्यांची बदनामी करणारे – वाकचौरे

अकोले ( प्रतिनिधी )
काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांचे दूधभेसळी संदर्भातील वक्तव्य हे दूध उत्पादक शेतकरी यांची बदनामी करणारे असून सहकारी अन खाजगी दूध संघाना पाठीशी घालणारे आहे. दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे दुधात भेसळ बाबद व्यक्तव्य खरे आहे. असे मत जयकिसान सह दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी म्हटले आहे
श्री वाकचौरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात दुधावर ताव मारणारे काळे बोके कोण आहे हे जनतेला माहित आहे. दुधात भेसळ शेतकरी करित नसून राज्यात जेवढे दूध उत्पादन होते त्यापेक्षा जास्त विक्री होते. महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री हे राज्यातील शेतकऱ्यासाठी बाजार भाव मिळावे यासाठी मेहनत करित आहेत.
आज राज्यात सहकारात सर्वात जास्त दूध संघ व खाजगी दूध हे काँग्रेस अन राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यात आहेत. अन हे संघाच्या कारभाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम आ.बाळासाहेब थोरात करित आहेत. या संघात जी भेसळ होत आहेत. त्यावर ना. विखे पाटील यांनी करडी नजर केली आहे. शेतकरी दुधात पाण्याची भेसळ करत नाही. त्याने जर तांब्याभर पाणी टाकले तर संकलन केंद्रावर त्याचे दूध परत पाठवले जाते. त्यामुळे आ. थोरात हेच शेतकऱ्यावर आरोप करीत आहे. किंवा शेतकऱ्यांची दिशाभूल करित असून शेतकऱ्यांचे माथे भडकविण्याचे काम करित आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यातील दूध संघाचे कधीही जास्त भाव दिला नाही अथवा शेतकऱ्यांना नफा दाखवला नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा कुठली नैतिक अधिकार नाही.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व खाजगी व सहकारी दूध संघाचे बैठका घेऊन शासन परिपत्रक काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
मात्र थोरांतासारखे नेते अनेक वर्ष सत्तेत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. थोरात मंत्री असताना गुजरात ने जसा अमूल सारखा ब्रँड निर्माण केला तसा साधा प्रयत्न केला नाही. थोरात यांनी आता सर्व दूध संघांच्या प्रतिनिधी बोलून दूध उत्पादक यांना न्याय देण्याचे सोडून भ्रम निर्माण करित आहे. अन विखे पाटील यांचे बरोबर शेतकऱ्यांची बदनामी करित आहे.