इतर

खेळाडूंना राजाश्रयाबरोबर नोकरीमध्ये आरक्षण महत्वाचे !
पद्मश्री पोपटराव पवार

पारनेरमध्ये राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पंजाब राज्यात खेळाडूंना राजाश्रयाबरोबर नोकरीमध्ये मोठ्याप्रमाणात आरक्षण देण्यात आलेले आहे परंतु महाराष्ट्रात या खेळाबाबत व खेळाडुंसाठी राजाश्रय मिळताना दिसत नाही.त्यामुळे खेळाडूंना राजाश्रया बरोबर नोकरीमध्ये आरक्षण महत्वाचे व गरजेचे असल्याचे मत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी यांनी व्यक्त केले आहे.
पारनेरमध्ये व्हाॅलीबाॅल प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते क्रिडा संकुलावर करण्यात आले आहे.दोन दिवस या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा चालणार असून महाराष्ट्रातील १९ पुरुष संघ व ८ महिला संघ राज्यातुन सहभागी होणार आहे.
या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचा प्रारंभ पुणे विरूद्ध बीड या जिल्ह्यासंघा दरम्यान झाला असुन अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहे.
यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आमदार निलेश लंके उप जिल्हाध्यक्ष अर्जुन भालेकर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे नगराध्यक्ष विजय औटी उपनगराध्यक्ष सौ सुरेखा भालेकर शरद कदम प्रा.बबनराव झावरे प्रा संजय लाकुडझोडे अशोकराव सावंत गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे अशोकराव घुले माजी सभापती सुदाम पवार ज्ञानदेव लंके गुरुजी भागुजी दादा झावरे दीपक अण्णा लंके चंद्रकांत ठुबे सभापती योगेश मते डॉ बाळासाहेब कावरे नंदकुमार औटी नगरसेवक भुषण शेलार विजय डोळ शाहिरमामा गायकवाड कैलास गाडिलकर सरपंच सचिन पठारे दौलत गांगड सुवर्णा धाडगे युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे तालुकाध्यक्ष पुनमताई मुंगसे जयवंत साळुंखे नगरसेवक नितीन आडसुळ भाऊ चौरे डॉ मुदस्सर सय्यद राजू तांबे सतीश गंधाक्ते अशोक चेडे श्रीकांत साठे डॉ विद्या कावरे निता औटी प्रियंका औटी सचिन औटी सुभाष शिंदे शहराध्यक्ष बंडू गायकवाड अक्षय चेडे रमीज राजे बाळासाहेब मते भाऊसाहेब भोगाडे डॉ सादिक राजे बबन‌ चौरे यांच्या सह महाराष्ट्रातील अनेक नामवंत खेळाडू उपस्थित होते.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की
राजकारण समाजकारणात आमदार निलेश लंके यांनी आदर्श काम उभे केले आहे. राजसत्ता महत्त्वाची आहे या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा आहे या पारनेर तालुक्यासाठी महत्त्वाचे आहे . मी हिवरे बाजार सरपंच म्हणून काम करत असताना ग्रामपंचायत मैदान व खेळाचे मैदान वेगळे आहे त्यामुळे या डावपेच या खेळाच्या माध्यमातून मिळाले आहे .खेळ शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करत असतो‌ पॅकेज व मिडियाच्य जमान्यात खेळ मागे पडला आहे ही शोकांतिका आहे असेही पोपटराव पवार म्हणाले. आज आई वडिलांना मुलांसाठी वेळ द्यावा लागतो.पंजाब व इतर प्रांतात खेळाडुच्या मागे उभे राहत असतात नोकरीत आक्षरण देत असतात त्याप्रमाणे राजाश्रय हा महत्त्वाचा आहे.आरक्षण हे खेळाडुसाठी असले पाहिजे.लाॅर्डस मैदानावर खेळला म्हणजे खेळाडूच्या दृष्टीने वैभव आहे.रणजी खेळासाठी पाच राजाश्रय व पाठबळ मिळणे गरजेचे आहे.पारनेरला नवीन ओळख देण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी केले आहे असे गौरवोद्गार पोपटराव पवार यांनी काढले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापाहाड यांनी केले तर आभार प्रा संजय लाकुडझोडे सर यांनी केले.

ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ
आमदार निलेश लंके
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात जास्तीत खेळाडू तयार झाले पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडुंना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्हाॅलीबाॅल संघटनेचे अध्यक्ष या नात्याने पारनेर तालुक्यातुन यांचा श्रीगणेशा केला आहे.तर यापुढील काळात सर्वातोपरी सहकार्य करण्याचे व खेळाडूंचे प्रश्न सरकारी दरबारी मांडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे ‌‌.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button