गुगल गर्ल’ परिणीता दुधगुंडीचा पद्मशाली सखी संघमच्या वतीने सन्मान…!

सोलापूर : पूर्वाश्रमीचे पूर्व भागातील रहिवासी व सध्या हैदराबाद येथे स्थायिक असलेल्या मदन दुधगुंडी यांची कन्या ‘परिणीता’ ही शिक्षण आणि बुध्दिमत्तेच्या कौशल्यावर ‘गुगल’ मध्ये तब्बल सव्वा कोटी पेक्षा जास्त पॅकेज मिळाल्याबद्दल सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने आज शनिवारी सकाळी ‘गुगल गर्ल – परिणीता’चा सन्मान करण्यात आले आहे.
फाउंडेशन व सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. परिणीता दुधगुंडी हिचा सन्मान पद्मशाली सखी संघमचे अध्यक्षा ममता मुदगुंडी यांनी सोलापूरी टॉवेल व नॅपकीन बुके देउन केले. यावेळी सखी संघमचे सहसचिवा ममता तलकोकूल, खजिनदार दर्शना सोमा, समन्वयिका कला चन्नापट्टण, दुर्गा रेस, सुधीर सोमा (पुरोहित), ॲड. सूरज दुधगुंडी, प्रफुल्ल दुधगुंडी, अश्विनी दुधगुंडी, रेखा अन्नलदास, वर्षा मामड्याल, मंजुळा दुधगुंडी आणि दुधगुंडी कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते