बालकाचे शाळेत पहिलं पाऊल आनंदात पडले पाहिजे : अंकुश ओमासे

जांभळेवाडी केंद्रात शाळापुर्व तयारी मेळावा सपंन्न
अकोले : पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकाचे शाळेत पडणार पहिल पाऊल हे मोठ्या आनंदात पडले पाहिजे त्यासाठी त्याच्या आगमनाची जय्यत तयारी करुन जून मध्ये पहिलीत बालकाने शाळेत प्रवेश घेताना त्याचे वाजतगाजत आनंददायी स्वागत करा असे आवाहन जांभळेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख अंकुश ओमासे यांनी केले.
श्री. ओमासे गांजविहिर (ता. अकोले) येथे आयोजित जांभळेवाडी केंद्राच्या शाळापुर्व तयारी कार्यक्रम प्रशिक्षणात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर विजय घनकुटे, राजेंद्र उकिरडे, बाळू वायळ हे उपस्थित होते.
श्री. ओमासे म्हणाले, लहान वयातच बालकांना शाळेची गोडी लागली पाहिजे ते शाळेत आले पाहिजेत आणि शाळेत रमले पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्या साठी या मेळाव्याचे आयोजन केले जात असून बालकाचे शाळेत पडणारे पहिले पाऊल हेच त्याच्या साठी आनंददायी ठरले पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांनी एकत्र येऊन पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले पाहिजे. त्यासाठी जून मध्ये सर्वांनी चांगली तयारी करावी.
मेळाव्यात नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणन पूर्वतयारी, प्रमाणपत्र वितरण असे सात स्टाॅल उभारण्यात आले होते.
जांभळेवाडी केंद्रातील वाजेवाडी, कचरेवाडी, आबिटखिंड, भोजनेवाडी, उंबरेवाडी, पळसुंदे, जांभळेवाडी, त्रिशूळवाडी, फोफसंडी, कोंडारवाडी, सातेवाडी, खवटी, गांजविहीर, मोरवाडी, खेतेवाडी या शाळांतील शिक्षक व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय घनकुटे, राहूल गोडे, रोहिदास धिंदळे, भास्कर दिघे, अरुण वायळ, सोमनाथ मुठे, बाळू वायळ, राजेंद्र उकिरडे, दादाभाऊ जोशी, पोपट चौधरी, अजय चौधरी, संदीप गोडसे, मंदा नवले, वैभव लाटणे, मिना पडवळे, दिलीप गभाले, विकास भागीत, चांगदेव दरेकर, नारायण चौधरी, विनायक क्षिरसागर, कुंडलिक मुठे, साहेबराव देठे, गोविंद खोकले, भाऊसाहेब कडू, लक्ष्मण ठोंगिरे, संपत दिघे, विक्रम होळकर, श्री. वळे, कुंडलिक शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.
