शिष्यवृत्ती परीक्षेत पारनेर चे 54 विद्यार्थी उत्तीर्ण 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात एन एम एम एस परीक्षेत बसलेल्या 86 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झाली आहेत व 42 विद्यार्थी हे सार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांनी दिली आहे.
पारनेर येथील इंग्लिश स्कूल विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जाते त्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी कशी केली जाईल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. नुकत्याच झालेल्या एन एम एम एस परीक्षेसाठी 86 विद्यार्थी विद्यालयातून परीक्षेत बसले होते त्यातील 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने व त्यातील गौरी राहुल सोंडकर, सुयश संतोष सोबले अनुष्का नंदू शिंदे या इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असून त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य बाळासाहेब करंजुले पर्यवेक्षक बाबासाहेब चौरे व एन एम एस एस विभाग प्रमुख सुजाता गुंड, वैशाली सालके, कुसकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक यांनी अभिनंदन केले आहे.