भातकुडगाव फाटा विकासाच्या दृष्टीने कात टाकतो आहे – शिवशाहीर कल्याण काळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भातकुडगाव फाटा विकासाच्या दृष्टीने कात टाकतो आहे. या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय सुरू आहेत.त्यामध्ये आरोग्य सेवा व औषधे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन या दोन्हीही गोष्टी एकाच छताखाली मिळणार असल्याने भातकुडगाफाट्याच्या वैभवात नक्कीच भर पडेल. असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. असे मत शिवशाहीर कल्याण काळे यांनी व्यक्त केले.
शेवगाव -नेवासा रोड वरील भातकुडगाव चौफुल्यावर मोरया मेडिकल अँड मोरया क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी शिवशाहीर कल्याण काळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री क्षेत्र देवगड संस्थांचे सेवेकरी प्रल्हाद जाधव गुरुजी, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे पाटील, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जलभूमीचे बाळासाहेब जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे,ज्येष्ठ पत्रकार आर. आर. माने, सुखदेव फुलारी, भारुडकार हमीद सय्यद उपस्थित होते.
यावेळी बक्तपुरचे सरपंच राहुल बेडके, माजी सरपंच रायभान सामृत,देवटाकळीचे उपसरपंच अशोक मेरड,संदीप खरड, बबन जाधव, मुकुंद जमधडे, डॉ. महेश शिंदे, शिवम सामृत, तुकाराम जाधव, आजिनाथ खरड,राजेंद्र लोमटे, सुरेश आरगडे, विठ्ठल फटांगरे, संभाजी माळवदे, अण्णासाहेब गर्जे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकिसन माने यांनी केले आभार भाऊसाहेब सामृत यानी मानले.