देवठाण येथे खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

अकोले/ प्रतिनिधी
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन छोटेमोठे प्रक्रिया उद्योग उभारून ग्रामीण भारताला समृद्ध व सशक्त करण्यासाठी आपापल्या दारी गावरान सेंद्रिय बियाणांची परसबाग फुलवावी असे प्रतिपादन बीजमाता पद्मश्री रहीबाई पोपेरे यांनी देवठाण येथे केले
. ग्रामपंचायत देवठाण जनसेवा ग्रामविकास मंडळ देवठाण व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी शिक्षण विस्तार अधिकारी सोनवणे मॅडम होत्या तर तर प्रमुख पाहुणे म्हणून राजूरच्या आदर्श सरपंच हेमलता ताई पिचड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अब्दुल इनामदार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईकवाडी किरण शेळके,आढळा विद्यालयाचे माजी प्राचार्य रामदास सोनवणे सर, सरपंच निवृत्ती जोरवर, उपसरपंच माधव कातोरे ,सुभाषराव सहाने, बाळू गायकवाड, राजाराम पथवे, आनंदा गिऱ्हे, साहेबराव सोनवणे, शामराव पथवे, भारत सहाणे, बाळू बोडके, सादिक इनामदार, रामदास काळे, दत्तू शेळके,श्रीकांत सहाने, केशवराव बोडके, किसन काकड ,अनिल सहाने, संदीप कराड,प्रतिक भराडे, संजय शेळके, सुशांत शेळके, सार्थक सहाणे,पत्रकार विजय शेळके आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हळदी कुंकू समारंभात पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते केशर आंब्याची रोपे वाटप

महिलांनी दैनंदिन कामकाजातून वेळ काढून स्वतःच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अरुण शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व खेळ रंगला पैठणीचा आदी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संगीत खुर्ची व फुग्यांचा खेळ याचा महिलांनी मनमुराद आनंद घेतला विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी भेट देण्यात आली यामध्ये अश्विनी गणेश बोडके सविता किरण जोरवर या महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या तर उपविजेत्यांनाही पर्स व पाऊच भेट देण्यात आले . उपस्थित महिलांना हळदी कुंकवाच्या समारंभात वाण म्हणून उच्च दर्जाचे केशर आंब्याची पाचशे रोपे पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते भेट देण्यात आली यावेळी महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती .देवठाण मध्ये खास महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल महिलांनी अरुण भाऊ शेळके मित्र मंडळाचे ग्रामपंचायतचे आभार मानले .
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांनी जनसेवा ग्रामविकास मंडळाचे कौतुक करत सामाजिक कार्यात महिलांनी सहभागी होऊन जीवनाचा आनंद घ्यावा व स्वतःबरोबरच कुटुंबाचा पर्यायाने गावचा विकास साधावा आगामी काळात महिलांचे सर्वांगीण विकासासाठी पत्रकार संघाचे माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला.

बचत गटांना कर्ज वितरण
सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे गणोरेचे शाखाधिकारी पंकज देशमुख यांनी उपस्थित महिलांना बचत गटांना कर्ज पुरवठा व परतफेड याबाबत मार्गदर्शन केले तसेच बारा महिला बचत गटांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्या भारतीशेळके, मंजुळा पथवे,विमल काळे विजया सहाने सुनीता गांगड , मनीषा मेंगाळ,आश्लेषा काकड, महिला ग्राम संघाचे अध्यक्ष मनीषा सहाने.कृषी विभागाचे के.वी.तांबे शेळके रश्मी शेळके, कविता शेळके,हर्षला शेळके, कल्पना कराड, जोर्वेकर आदींनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण शेळके यांनी केले तर सूत्रसंचलन दिपिका शेळके व आभार मनिषा सहाणे यांनी मानले.