श्रीक्षेत्र काकनेवाडीत श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
पारनेर तालुक्यात सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या काकनेवाडी (श्रीराम नगर )येथे श्रीराम नवमी उत्सहात साजरी झाली. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी निमित्त अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम जीवन गौरव पुरस्कार प्राप्त गुरुवर्य डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या उपस्थितीत डॉ. जाधव बाबांचे शिष्य हभप. नवनाथ महाराज निकम यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहची सांगता झाली.

हभप निकम बाबांनी काल्याच्या सेवेसाठी
! कंठी धरीला कृष्णमनी
अवघा जणी प्रकाश!!
संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर सेवा केली. चिंतनात महाराजांनी काल्याचे तीन प्रकार सांगितले 1)दही भाताचा काला
2)रामनामाचा काला
3)जिव शिव ऐक्य ब्रम्हाचा काला हें तीन काले तीन शरीर करिता आहे. पहिला स्थूल शरीराकरिता दुसरा काला सूक्ष्म(मन ) शरीरा करिता,तिसरा कारण शरीराकरिता असा वेदांत विचार महाराजांनी कीर्तनात सांगितला.
पुरस्कार प्राप्त केल्यानंतर डॉ.जाधव बाबा प्रथमच श्रीरामनगर मध्ये आले होते.मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी बाबांचे स्वागत केले.
रामनवमीच्या दिवशी भव्य मिरवणूक, अतिशबाजी करण्यात आली होती तसेच शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
मुंबईकर मंडळी आणि काकनेवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.