इतर

मिनानाथ पांडे यांच्या निधनाने जनतेसाठी संघर्ष करणारे नेतृत्व हरपले-छगन भुजबळ

अकोले प्रतिनिधी

जेष्ठ नेते मिनानाथ पांडे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष करणारे नेतृत्व हरपले- असे राज्याचेअन्न, नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेआहे

अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर
असणारे नेते, ओबीसी चळवळीतील माझे सहकारी श्री. मीनानाथ पांडे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे.
विविध संस्थांच्या व योजनांच्या उभारणीत मीनानाथ पांडे यांचे मोलाचे योगदान
आहे. त्यांच्या निधनामुळेअकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे आणि त्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
पांडे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ
मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभोअसे मंत्री भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button