आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२८/०४/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०८ शके १९४६
दिनांक :- २८/०४/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति ०८:२२,(पंचमी),
नक्षत्र :- मूळ समाप्ति २८:४९,
योग :- शिव समाप्ति २६:०५,
करण :- कौलव समाप्ति २०:१३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१३ ते ०६:४९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१६ ते १०:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड ०८:२२ प., पंचमी श्राद्ध,
———
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०८ शके १९४६
दिनांक = २८/०४/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
मानसिक ताणतणाव जाणवेल. औद्योगिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन संधि उपलब्ध होतील. कमिशनमधून चांगला लाभ होईल.
वृषभ
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. झोपेचे तक्रार जाणवेल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्यांशी मतभेद संभवतात.
मिथुन
प्रवासात काळजी घ्यावी. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. उपासनेचे बळ वाढवावे.
कर्क
नवीन स्नेह संबंध जुळून येतील. प्रेमसंबंधाला पुष्टी मिळेल. करमणुकीत वेळ घालवाल. स्वच्छंदी वृत्तीने वागाल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.
सिंह
दिवसभर घरगुती कामात गुंग राहाल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामात मन रमवले जाईल. जोडीदाराविषयीचे गैरसमज काढून टाकावेत. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
कन्या
उष्णतेचे विकार संभवतात. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न करावा. भावंडांची वेळीच मदत मिळेल.
तूळ
कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. व्यावहारिक दृष्टीकोन बाळगाल. कमी कष्टात कामे पार पडतील. आवडीचे पदार्थ खाल.
वृश्चिक
आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.
धनू
तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक स्थैर्य जपावे. हाताखालील लोकांकडून कामे वेळेत पार पडतील. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मकर
स्वभावात काहीसा उधळेपणा येईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. तुमच्या मनाची तरलता दिसून येईल. जुगाराची आवड पूर्ण कराल. दिवस स्वच्छंदीपणे घालवाल.
कुंभ
रागावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टींबाबत दृढ निश्चय करावा लागेल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. एककल्ली विचार करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल.
मीन
सामुदायिक गोष्टींचे भान राखावे. गैर समजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांचे विकार बळावू शकतात. कचेरीच्या कामात वेळ जाईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर