अॅड प्रतापकाका ढाकणे यांच्या हस्ते होणार पत्रकारांचा गौरव!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा ६ जानेवारी २०२२ या पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकार दिनाच्या पुर्वसंध्येला ५ जानेवारी २o२२ रोजी ११ वाजता. हिंद वस्तीगृह सभागृह पाथर्डी, येथे पत्रकारांचा गौरव व स्नेहभोजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघर्ष योध्दा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रतापकाका ढाकणे यांच्या शुभहस्ते व दैनिक दिव्यमराठी अहमदनगरचे संपादक अनिरुध्द देवचक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पाथर्डी तालुका व अॅड. प्रतापकाका ढाकणे मित्र मंडळ शेवगाव -पाथर्डी तालुका यांच्या वतीने कारण्यात आले आहे.
पत्रकार दिनाच्या पुर्वसंध्येलाच होणार पत्रकारांचा गौरव
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्रच ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. जिल्हयासह तालुक्यांच्या मुख्य ठिकाणी व इतर छोट्या मोठया ठिकाणी पत्रकार दिनाचे कार्यक्रम मोठया उत्साहात होत असतात. या कार्यक्रमांना पत्रकारांना उपस्थित राहता यावे. म्हणुन पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पत्रकार दिनाच्या पुर्वसंध्येलाच, अॅड प्रतापकाका ढाकणे यांच्या हस्ते दोन्ही तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्याचे जहिर करण्यात आले आहे.