पल्लवी बांडे हिची राज्य विक्रीकर निरीक्षक पदासाठी निवड

विलास तुपे
राजूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये कु पल्लवी नामदेव बांडे (रा कोंदणी अकोले) हिने राज्य विक्रीकर निरीक्षक तसेच कक्ष अधिकारी या दोन्ही पदांवर घवघवीत यश मिळवले या यशाबद्दल तिचा राजूर येथे सत्कार करण्यात आला.
प्राथमिक शिक्षण मराठी शाळा खडकी व सावरकुटे माध्यमिक शिक्षण- मधुकरराव पिचड विद्यालय राजूर उच्च माध्यमिक सर्वोदय विद्या मंदीर राजुर येथे झाले
स्पर्धा परीक्षांचा मनामध्ये ध्यास घेऊन तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (STI) या पदासाठी परिक्षा दिली त्यात तिची निवड झाली तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग- 2 पदी ही निवड या दोन्ही निवडी विशेष म्हणजे एकाच वेळेस झालेल्या आहेत. लहानपणापासूनच वाचनाची आवड: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताने कोणतेही प्रकारचे क्लासेस नाहीत फक्त ग्रंथालयातील पुस्तकांच्या बळावर एवढी मोठी गरुडझेप घेत ग्रामीण भागातील पल्लवी बांडे हिने उंच भरारी घेतली . आदिवासी भागातील विद्यार्थ्यांत प्रचंड मेहनत करण्याची क्षमता आहे परंतु
ते करत नाहीत याची खंत पल्लवी बांडे हिने नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी मधुकर राव पिचड विद्यालय राजूर या ठिकाणी ग्रंथालयाचे उद्घाटन करताने सांगितले. शिक्षक बांडे सर यांची ती कन्या आहे वडिलांनी केलेले मार्गदर्शन तसेच त्यांनी दिलेली साथ यामुळे मी हे करू शकले असे पल्लवी हिने म्हटले आहे पल्लवीच्या या यशाबदल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
